शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

तरुण फळविक्रेत्यांवर काळाचा घाला; तेलंगणातील अपघातात तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 16:17 IST

तेलंगणात झालेल्या या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून आॅटोचालक  गंभीर जखमी आहे.

ठळक मुद्देचौघेही तरुण भागीदारीत सफरचंद विक्रीचा व्यवसाय करीत होते.

देगलूर (जि. नांदेड) :  तेलंगणातील नारायणखेड येथील बाजारपेठेत सफरचंद विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या आॅटोला विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव  ट्रकने धडक दिली. या अपघातात देगलूर येथील शेख सद्दाम शेख मौलाना  (२८, लाईनगल्ली), शेख सैलानी बाबा शेख महेबूब (२५, भायेगाव रोड), शेख फिरदोस शेख वलीयोद्दीन (३०, जियाकॉलनी ) या तीन तरुणांचा मृत्यू झाला. तर एका जणाची प्रकृती गंभीर आहे. ही  घटना मंगळवारी कंदरपल्ली चौरस्त्यावर सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली. 

मंगळवारी नारायणखेड येथे आठवडी बाजार असल्याने शेख सद्दाम शेख मौलाना, शेख सैलानी बाबा शेख महेबूब, शेख फिरदोस शेख वलीयोद्दीन व आॅटोचालक शेख हबीबवल्ली चाऊस (२८, तेलीगल्ली ) हे देगलूर येथील चारजण आॅटोने (टीएस १६-युसी ११३०) नारायणखेडकडे जात होते. कंदरपल्ली चौरस्त्यावर समोरुन येणाऱ्या ट्रकने (एमएच ३० एबी- ३५८९) दिलेल्या जोरदार धडकेत शेख सदाम शेख मौलाना हा तरुण जागेवरच ठार झाला. गंभीर दोन जखमींना बांसवाडा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी निजामाबादला नेण्यात येत असताना रस्त्यातच सैलानी बाबा शेख महेबूब याचा मृत्यू झाला. तर  शेख फिरदोस शेख वलीयोद्दीन नांदेड येथे उपचारासाठी नेताना नरसीजवळ त्याची प्राणज्योत मालवली. 

आॅटोचालक शेख हबीब वली चाऊस याच्या डोक्याला जबर मार लागला असून त्याच्यावर निजामाबादच्या शासकीय रुग्णालयात  उपचार सुरू आहे. दरम्यान, अपघाताची घटना घडताच नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार यांनी अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांसह घटनास्थळी धाव  घेऊन गंभीर जखमींना उपचारासाठी इतरत्र हलविण्यास मदत केली. याप्रकरणी बिचकुंदा पोलीस ठाण्यात ट्रकचालकावर गुुन्हा नोंद करण्यात आला आहे.

देगलूर शहरावर शोककळातेलंगणात झालेल्या या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून आॅटोचालक  गंभीर जखमी आहे. हे चौघेही देगलूर येथील तरुण भागीदारीत सफरचंद विक्रीचा व्यवसाय करीत होते. चारही तरुण अविवाहित असून दररोज कष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीत होते. या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबियांसह देगलूर शहरावर शोककळा पसरली आहे. 

टॅग्स :Deathमृत्यूNandedनांदेडAccidentअपघातTelanganaतेलंगणा