शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

३८० जणांनी भरला आॅनलाईन कर

By admin | Updated: July 8, 2014 00:34 IST

नांदेड : मालमत्ता करात सुधारणा झाल्यानंतर महापालिकेने अग्रीम कर भरल्यास सूट देण्याच्या सुरू केलेल्या योजनेला मालमत्ताधारकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे़

नांदेड : मालमत्ता करात सुधारणा झाल्यानंतर महापालिकेने अग्रीम कर भरल्यास सूट देण्याच्या सुरू केलेल्या योजनेला मालमत्ताधारकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून ५ ते ३० जून या कालावधीत ३८० मालमत्ताधारकांनी आपल्याकडील ४२ लाख रूपयांचा मालमत्ता कर आॅनलाईन प्रणालीद्वारे भरून २ टक्के जादा सूट मिळवली आहे़ १ एप्रिल २०१४ पासून २०१४- १५ चा अग्रिम मालमत्ता कर भरणाऱ्या मालमत्ताधारकांना विशेष योजना जाहीर करून मालमत्ता करात सूट देण्यात आली आहे़ त्यानुसार ३० जून २०१४ पर्यंत बिल कलेक्टर किंवा क्षेत्रिय कार्यालयात कराचा भरणा केल्यास ८ टक्के आणि आॅनलाईन प्रणालीद्वारे भरल्यास २ टक्के जादा या प्रमाणे मालमत्ता करात एकूण १० टक्के सूट देण्यात आली़ आॅनलाईन प्रणालीद्वारे करभरणा झाल्यास मनपाच्या बिल कलेक्टरकडून मालमत्ताधारकांशी संपर्कासाठी लागणार वेळ, मागणी बिल आणि पावतीसाठी लागणाऱ्या कागदाचा खर्च वाचून मनुष्यबळावरील खर्चातही कपात करणे शक्य असल्याने महापालिकेने आॅनलाईन भरणा करणाऱ्यांना जादा सूट देण्याचे धोरण राबवले आहे़ ही योजना जाहीर झाल्यापासून ३८० जणांनी आपल्याकडील ४१ लाख ६३ हजार ५९५ रूपयांचा मालमत्ता कर आॅनलाईन भरला़ यात शेवटच्या आठवड्यात २४ ते ३० जून या कालावधीत सर्वाधिक २४६ धारकांनी आपला ३४ लाख ३८ हजार २७ रूपयांच्या कराचा भरणा आॅनलाईन केला आहे़ महापालिकेने प्रथमच राबवलेल्या या प्रणालीची माहिती होण्यासाठी प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयात एकाच वेळी एकदिवसीय शिबिर घेतले होते़ १ जुलै ते ३० सप्टेंबर या दरम्यान आॅनलाईन कर भरणाऱ्यास ७ आणि रोखीने भरणाऱ्यास ५ टक्के याप्रमाणे सूट दिली जाणार आहे़ १ आॅक्टोबर ते ३१ डिसेंबर या दरम्यान कराचा भरणा केल्यास आॅनलाईनधारकांना ५ टक्के आणि रोखीने भरणाऱ्यास ३ टक्के सूट मिळणार आहे़ जानेवारी ते मार्च २०१५ दरम्यान कर भरणाऱ्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही़ आॅनलाईन स्वरूपात कराचा भरणा करण्यास असमर्थ असणाऱ्यांनी आपल्या बिल कलेक्टर किंवा क्षेत्रिय कार्यालयात संपर्क करून रोख स्वरूपात कराचा भरणा करून ३० सप्टेंबर पर्यंत ५ टक्के सूट प्राप्त करून घ्यावी़ ज्यांनी मालमत्ता कर भरला नाही, अशांनी रोख किंवा आॅनलाईन कर भरण्याच्या सूट योजनेचा लाभ घेवून शहराच्या विकासकामात स्वत:चा सहभाग नोंदवावा, असे आवाहन महापौर अब्दुल सत्तार, स्थायी समितीचे सभापती उमेश पवळे, आयुक्त जी़ श्रीकांत यांनी केले आहे़ (प्रतिनिधी)