शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

३३ केव्ही उपकेंद्रांना मान्यता

By admin | Updated: July 18, 2014 01:51 IST

जाफराबाद : जाफराबाद तालुक्यातील सिपोरा अंभोरा व भोकरदन तालुक्यातील सिपोरा बाजार येथे विशेष बाब म्हणून ३३ केव्ही उपकेंद्राला राज्यशासन उर्जा विभागाने मान्यता दिली आहे.

जाफराबाद : जाफराबाद तालुक्यातील सिपोरा अंभोरा व भोकरदन तालुक्यातील सिपोरा बाजार येथे विशेष बाब म्हणून ३३ केव्ही उपकेंद्राला राज्यशासन उर्जा विभागाने मान्यता दिली आहे. प्रत्येकी १ कोटीपेक्षा जास्त निधीची तरतूद उपलब्ध करून देण्यात आली. याची निविदा प्रक्रिया देखील पूर्ण होऊन पुढील आठवड्यात काम सुरू करण्याच्या सूचना वीज वितरण कंपनीला दिल्याचे आ. चंद्रकांत दानवे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.येथील शासकीय विश्रामगृहामध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली. वाढोणा तांडा व पिंपळगाव शेरमुलकी येथे प्रत्येकी एक ३३ केव्ही उपकेंद्र प्रस्तावित करण्यात आले आहे.या उपकेंद्रामुळे शेतकऱ्यांच्या विजेचा प्रश्न सुटणार असून, विजेचा तुटवडा कमी करण्यासाठी नवीन १०० एमव्हीएचे जाफराबादसाठी ३६ व भोकरदन करिता ३४ रोहित्रे मंजूर झाली आहेत. तसेच सिंगल फेज योजनेला देखील प्राधान्य देण्यात येणार आहे.आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आ. चंद्रकांत दानवे यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पा. दानवे यांच्यावर श्रेय घेण्याचे आरोप केले. त्यांनी राज्य आणि केंद्र शासन यांच्याकडून येणाऱ्या निधीचा पहिला फरक समजून घ्यावा, श्रेय घ्यायचेच असेल तर केंद्राकडून विशेष निधी उपलब्ध करावा, असे आवाहन केले. वीज केंद्रामुळे परिसरातील विजेचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याचे दानवे यावेळी म्हणाले. यावेळी तालुकाध्यक्ष सुधीर पाटील, माजी सभापती राजेश चव्हाण, शहराध्यक्ष शेख कौसर, दत्तू पंडित, रामभाऊ दुनगहू, फैसल चाऊस, सर्जेराव शिंदे, प्रकाश ताठे, रामेश्वर गावंदे, माणिकराव वायाळ, दादाराव सरवदे, उत्तम उगले, दिनकर महाराज अंभोरे, वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता तालेवार, सहाय्यक अभियंता संदीप सोनवणे यांची उपस्थिती होती.(वार्ताहर)