शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

९७ ग्रामपंचायतीतील इच्छुकांचे २ हजार ३६७ नामनिर्देशनपत्र दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:12 IST

कंधारः तालुक्यातील ९७ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक लढविण्यापूर्वीच गावपुढाऱ्यांची ऑनलाईन नामनिर्देशन पत्र भरतानाच मोठी अग्निपरीक्षा ठरत होती. ऑनलाईन फॉर्म भरत ...

कंधारः तालुक्यातील ९७ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक लढविण्यापूर्वीच गावपुढाऱ्यांची ऑनलाईन नामनिर्देशन पत्र भरतानाच मोठी अग्निपरीक्षा ठरत होती. ऑनलाईन फॉर्म भरत असताना नेट साथ देईना, वेळेत आपला क्रमांक येईना, थंडीची हुडहुडी कमी होईना आदीमुळे रात्र जागून काढण्याचा प्रसंग ओढावला.

चार दिवसात २ हजार ३६७ जणांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केल्याचे समोर आले आहे. ३० डिसेंबर हा उमेदवारी अर्ज सादर करण्याचा अखेरचा दिवस होता. त्यामुळे मोठी गर्दी झाली होती.

तालुक्यातील ग्रामपंचायतीचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर गावपुढाऱ्यांत कमालीचा उत्साह संचारला. गावची सत्ता ताब्यात घेण्यासाठी राजकीय खलबते सुरू झाली. परंतु प्रत्यक्ष निवडणूक लढविण्यापूर्वीच अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. त्यात पहिला दणका सरपंचाची झालेली आरक्षण सोडत रद्द झाली. त्यामुळे अनेकांनी गुडघ्याला घट्ट बांधलेले सरपंचाचे बाशिंग गळाले. सरपंचपद नेमके कुणासाठी राहणार हे गुलदस्त्यात असल्यामुळे गावचे राजकारण थंडावले होते. परंतु नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची तारीख जवळ आल्यानंतर गावचे राजकारण पुन्हा ढवळून निघाले.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू झाली. आणि ऑनलाईन नामनिर्देशन पत्र भरायला गेलेल्या इच्छुकांचा पुरता हिरमोड सुरू झाला. नेटची तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने तासन् तास ताटकळत बसण्याचा प्रसंग ओढवला. शेकडो जणांनी रात्र जागून काढली आणि उमेदवारी दाखल केली.

नामनिर्देशनपत्र भरलेली संख्या २३ डिसेंबर- निरंक, २४ डिसेंबर- १२, २८ डिसेंबर-२८६, २९ डिसेंबर- ७२२, ३० डिसेंबर १३४७. एकूण २,३६७. ऑनलाईन नामनिर्देशन पत्र भरताना उमेदवारांची होणारी दमछाक विचारात घेऊन ऑफलाईन उमेदवारी दाखल करण्यास २९ डिसेंबर रोजी मुभा देण्यात आली. वेळ वाढवून देण्यात आल्याने गावपुढाऱ्यांना दिलासा मिळाला. त्यामुळे ३० डिसेंबर रोजी गावपुढारी तणावमुक्त झाले. नामनिर्देशन पत्र दाखल करताना मोठी झुंबड उडाली. आणि एकाच दिवशी १ हजार ३४७ जणांनी उमेदवारी दाखल केली. उमेदवारी झालेल्या संख्येची माहिती संकलित करण्यास रात्री बराच उशीर झाला. तहसीलदार व्ही.बी.मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार विजय चव्हाण ,नायब तहसीलदार सूर्यकांत ताडेवाड,नायब तहसीलदार नयना कुलकर्णी, नायब तहसीलदार गिडे ,उत्तम जोशी ,मन्मथ थोटे , गंगाधर गोंटे आदींनी परिश्रम घेतले .छाननी उमेदवारी परत घेणे, चिन्ह वाटपानंतर निवडणूक प्रचाराचा ज्वर अधिक वाढेल असेच ग्रामीण भागातील राजकीय वातावरण आहे.