शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. चा लाखोंचा महसूल बुडतोय

By admin | Updated: April 20, 2017 02:50 IST

जिल्हा परिषदेच्या मालकीच्या आठवडी बाजाराचे लिलाव पंचायत विभागाने गेल्या वर्षीच्या लिलाव रकमेपेक्षा कमी फरकाने केले.

कमी फरकाने झालेले बाजाराचे लिलाव पुन्हा करण्याची मागणी नागपूर : जिल्हा परिषदेच्या मालकीच्या आठवडी बाजाराचे लिलाव पंचायत विभागाने गेल्या वर्षीच्या लिलाव रकमेपेक्षा कमी फरकाने केले. यासंदर्भात विनोद पाटील या सदस्याने आक्षेप घेतला. त्यामुळे प्रशासनाने त्यांच्या सर्कलमधील बाजाराचा पुन्हा लिलाव करण्याच्या निर्णय घेतला. बुधवारी ही लिलावाची प्रक्रिया पार पडली. यात जो बाजार १ लाख ०२ हजारात गेला होता, तोच बाजार पुनर्लिलावात २ लाख ११ हजारात गेला. असे जिल्ह्यातील १५ बाजाराचे लिलाव गेल्या वर्षीच्या लिलावापेक्षा कमी फरकाने झाले आहे. त्यामुळे जि.प. व ग्रा.पं. चा लाखो रुपयांचा महसूल बुडाला आहे. त्यामुळे कमी फरकाने गेलेल्या बाजाराचे लिलाव पुन्हा घ्यावेत अशी मागणी जि.प. सदस्यांकडून होत आहे. जि.प. च्या मालकीचे जिल्ह्यात ३५ आठवडी बाजार आहे. या आठवडी बाजाराच्या लिलावातून जि.प.ला ७५ टक्के व स्थानिक ग्रामपंचायतला २५ टक्के उत्पन्न मिळते. २०१७-१८ साठी करण्यात आलेल्या लिलावातून ४९,९९,५०० रुपयांचा महसूल प्रशासनाला प्राप्त झाला. परंतु पंचायत विभागाने केलेले हे लिलाव दोषपूर्ण असल्याचा ठपका जिल्हा परिषदेच्या झालेल्या सभेत सदस्य विनोद पाटील यांनी ठेवला. त्यांनी घेतलेल्या माहितीत पंचायत विभागाने १५ बाजारांचे लिलाव गेल्या वर्षीच्या लिलावापेक्षा कमी फरकाने केल्याचा आरोप केला. नियमानुसार लिलाव हे गेल्या वर्षीपेक्षा जास्त रकमेने करणे आवश्यक आहे. परंतु पंचायत विभागाने केलेल्या लिलावात १,७०,००० रुपयांपर्यंत कमी रकमेत केले. यात कामठी तालुक्यातील वडोदा, चिचोली, सावनेर येथील भानेगाव , हिंगण्यातील कान्होलीबारा, रामटेक येथील मनसर, काचूरवाही, मौदा येथील अरोली , उमरेड येथील सिर्सी, सूरगाव, चांपा व भिवापुरातील नांद बाजाराचा समावेश आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला आहे.बाजार समितीच्या लिलावात घोळ झाल्याच्या आक्षेप घेतल्यावर प्रशासनाने विनोद पाटील यांच्या वडोदा येथील बाजाराचा फेरलिलाव घेतला. त्यात १ लाख ०९ हजाराची बढत मिळाली आहे. (प्रतिनिधी) लाखो रुपयांचा महसूल मिळू शकतो कमी फरकाने गेलेल्या बाजाराचे लिलाव पुन्हा घेतल्यास जि.प. ला लाखो रुपयांचा महसूल मिळू शकतो. त्यामुळे प्रशासनाने पुन्हा सर्व बाजाराचे लिलाव घ्यावे. पंचायत विभागाने ठेकेदारांना लाभ पोहचविण्यासाठी मुद्दाम कमी रकमेचे लिलाव केले आहे. - विनोद पाटील, सदस्य, जि.प.