शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवसांपासून मृत्यूला हुलकावणी देत होता योगेश()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:07 IST

नागपूर : गुन्हेगार गोलु धोटे त्याच्या पत्नीशी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या योगेश डोंगरेला तीन दिवसांपासून शोधत होता. स्वत:ला वाचविण्यासाठी योगेश ...

नागपूर : गुन्हेगार गोलु धोटे त्याच्या पत्नीशी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या योगेश डोंगरेला तीन दिवसांपासून शोधत होता. स्वत:ला वाचविण्यासाठी योगेश वस्तीतून पळून गेला होता. परंतु पोलिसांकडे न जाता घरी परतल्यामुळे त्याला आपला जीव गमवावा लागला. दरम्यान कोतवाली पोलिसांनी गोलु धोटे आणि त्याचा साथीदार हर्ष उमाडेची दोन दिवस पोलीस कोठडी मिळविली आहे. मंगळवारी झालेल्या या घटनेची लाईव्ह क्लिप व्हायरल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.

गोलुच्या पत्नीचे योगेशशी अनैतिक संबंध होते. १९ जूनला गोलुच्या आईने सुनेला योगेशसोबत बघितले होते. ही बाब माहीत झाल्यानंतर गोलु, हर्ष आणि ऋषिकेश ऊर्फ कांचा धुर्वे योगेशचा शोध घेत होते. त्याबाबत माहिती होताच गोलु वस्तीतून फरार झाला होता. गोलुचा गुन्हेगारी जगताशी संबंध असून तो आपला खून करू शकतो हे योगेशला माहीत होते. परंतु तरीसुद्धा योगेशने पोलिसात तक्रार केली नाही. तो प्रकरण शांत झाल्याचे समजून घरी परत आला. त्याची माहिती मिळताच गोलु संधी शोधत होता. गोलु आणि त्याच्या साथीदारांनी सोमवारी रात्री योगेशचा शोध घेतला. मंगळवारी सकाळी ते योगेश बाहेर पडण्याची वाट पाहत होते. तो घराबाहेर पडत नसल्याचे पाहून ते शस्त्र घेऊन योगेशच्या घरी पोहोचले. योगेश जीव वाचविण्यासाठी घराच्या मागील दारातून नागनदीच्या दिशेने पळाला. गोलु आणि त्याच्या साथीदारांनी त्याच्यावर हल्ला केला. जखमी झाल्यामुळे त्याने नागनदीत उडी मारली. तो नागनदी पार करून पळून जाणार होता. परंतु जखमी झाल्यामुळे यशस्वी झाला नाही. गोलुने पाठलाग करून मध्येच त्याला पकडले आणि चाकूने वार केले.

..........

पोलिसांना माहीत न होणे गंभीर

गोलु आणि योगेशमध्ये भांडण सुरू असल्याची बाब पोलिसांना माहीत नव्हती. परंतु शिवाजीनगर झोपडपट्टी संवेदनशील असल्यामुळे आणि गोलुची गुन्हेगारी प्रवृत्ती असल्यामुळे पोलिसांना माहीत होणे आवश्यक होते. पोलिसांचे नेटवर्क चांगले असते तर परिसरातील नागरिकांनी बीटमध्ये तैनात अधिकारी, कर्मचाऱ्यांना सतर्क केले असते. कोतवाली पोलिसांच्या याच चुकीमुळे १४ मे रोजी कुख्यात घाटे बंधूंनी दिवसाढवळ्या तडीपार गुंडाचा खून केला होता. त्यानंतर येथील ठाणेदाराची बदली करण्यात आली होती.

...............