शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

याकूबच्या फाशीचा ताण !

By admin | Updated: July 27, 2015 03:22 IST

मुंबईमध्ये बॉम्बस्फोट मालिकेने मोठा विध्वंस घडवून दहशतवादी कृत्य करणाऱ्या याकूब मेमनला नागपूर मध्यवर्ती

उपराजधानीत वाढला बंदोबस्त : आकस्मिक झडत्या, सर्वत्र नाकाबंदी निशांत वानखेडे ल्ल नागपूरमुंबईमध्ये बॉम्बस्फोट मालिकेने मोठा विध्वंस घडवून दहशतवादी कृत्य करणाऱ्या याकूब मेमनला नागपूर मध्यवर्ती कारागृहात फासावर लटकविले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून स्थानिक रहिवासी विलक्षण तणावात दिसून येत आहेत. फाशीनंतर या शहरात काय होईल, अशी चिंता साऱ्यांनाच भेडसावीत आहे. सामान्यजनांना पोलिसांकडून होणाऱ्या आकस्मिक झडत्या आणि नाकाबंदीला सामोरे जावे लागत आहे. पोलीस झोपडपट्ट्यांमध्ये शिरून झडत्या घेत आहेत. प्रस्तुत प्रतिनिधीने याच पार्श्वभूमीवर शहराचा फेरफटका मारला असता सामान्य व्यवहारात हा ताण दिसून आला. सावधगिरीच्या सूचनायाकूबला दिल्या जाणाऱ्या फाशीमुळे शहर पोलिसांना अलर्ट करण्यात आले आहे. नागरिकांमध्ये भयाचे वातावरण निर्माण होऊ नये याची काळजी घेतली जात आहे. सार्वजनिक ठिकाणी अनुचित प्रकार घडण्याची शक्यता लक्षात घेता, अशा ठिकाणी सावधगिरी बाळगण्याचा इशारा पोलीस विभागाकडून दिल्या जात आहे. शॉपिंग मॉल, सिनेमॉल, सिनेमागृहे, बाजार अशा ठिकाणी काहींना मौखिक तर काही ठिकाणी स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.काही दिवसांपासून सुरू असलेल्या हालचाली बघता, पोलीस विभागाकडून शहरात ‘वॉच’ वाढविल्याचे चित्र दिसून येत आहे. समाजकंटकांकडून घातपात घडवून आणण्याची शक्यता पाहता, शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी व आकस्मिक झाडाझडती घेतली जात आहे. अलर्ट लक्षात घेता सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.सिनेमागृहांनी वाढविली सुरक्षा व्यवस्थापोलिसांकडून अलर्टच्या कोणत्याही आगाऊ सूचना आम्हाला मिळाल्या नाहीत. मात्र घटनेचा ताण आमच्यावरही असल्याचे स्मृती सिनेमागृहाचे व्यवस्थापक संतोष मिश्रा म्हणाले. आम्ही आमची सुरक्षा वाढविल्याची माहिती त्यांनी दिली. सुरक्षा रक्षक वाढविले असून, सीसीटीव्हीचा वॉचही वाढविल्याचे त्यांनी सांगितले. पंचशील सिनेमागृहाचे व्यवस्थापक राजा लहरिया यांनी पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांकडून जाता-येता सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिल्या जात असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे अधिकचे तीन सुरक्षा रक्षक आणि वॉच वाढविल्याचे ते म्हणाले.टेकडी गणेश मंदिरात सावधगिरीघातपाताच्या स्थितीमध्ये धार्मिक स्थळांना लक्ष्य करण्याची शक्यता लक्षात घेता, टेकडी गणेश मंदिरात सावधगिरी बाळगण्यात येत आहे. स्पष्ट निर्देश मिळाले नसले तरी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडून तसा इशारा मिळाल्याचे टेकडी मंदिर ट्रस्टचे एस.बी. कुलकर्णी यांनी सांगितले. त्यामुळे आता रात्रभर विजेचे दिवे सुरू ठेवण्यात येत आहेत, तर विशेष प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.