शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
2
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
3
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
4
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
5
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
6
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
7
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
8
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
9
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
10
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
11
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
12
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
13
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
14
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
15
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
16
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
17
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
18
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
19
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
20
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
Daily Top 2Weekly Top 5

चिंताजनक! ओमायक्रॉनने घेतली डेल्टा व्हेरिएंटची जागा; राज्यासाठी धोक्याची घंटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2022 08:06 IST

९ जानेवारी रोजीदेखील ‘नीरी’त ५३ नमुन्यांचे ‘जीनोम सिक्वेन्सिंग’ करण्यात आले.

-मेहा शर्मा

नागपूर : राज्यातील बहुतांश कोरोनाबाधित डेल्टा व्हेरिएंटचे असल्याचा दावा राज्य शासनाकडून करण्यात येत असला तरी नागपुरातील ‘नीरी’च्या आकडेवारीमुळे या दाव्याला धक्का बसला आहे. ‘नीरी’ने केलेल्या ‘जीनोम सिक्वेन्सिंग’चा दुसरा अहवाल गुरुवारी समोर आला व त्यातील सर्व कोरोनाबाधितांना ‘ओमायक्रॉन’चाच संसर्ग झाल्याची बाब समोर आली आहे.

‘नीरी’ने मागील आठवड्यात ‘जीनोम सिक्वेन्सिंग’ची सुरुवात केली. ‘नीरी’ने ७ ते १० जानेवारी या कालावधीत कोरोनाची बाधा झालेल्यांपैकी ७३ ओमायक्रॉनने घेतली डेल्टा व्हेरिएंटची जागा जणांच्या नमुन्यांचे ‘जीनोम सिक्वेन्सिंग’ केले. गुळणीवर आधारित ‘डब्लूजीएस’ (व्होल जीनोम सिक्वेन्सिंग) या प्रणालीचा यात उपयोग करण्यात आला. त्यातील सर्व ७३ नमुने ओमायक्रॉनबाधित निघाले.

९ जानेवारी रोजीदेखील ‘नीरी’त ५३ नमुन्यांचे ‘जीनोम सिक्वेन्सिंग’ करण्यात आले. त्यातील ५१ नमुने ओमायक्रॉनबाधित असल्याचे आढळले. या दोन्ही ‘सिक्वेन्सिंग’मध्ये एकूण नमुन्यांपैकी ९८.४१ टक्के नमुने ओमायक्रॉनबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही बाब निश्चितच प्रशासन व वैद्यकीय यंत्रणांची झोप उडविणारी आहे. ‘डब्लूजीएस’ प्रक्रिया जास्त मेहनतीची, वेळ घेणारी आणि महाग आहे. त्यामुळेच काही निवडक नमुन्यांचे या प्रक्रियेतून सिक्वेन्सिंग करण्यात आले. ‘जीनोम सिक्वेन्सिंग’च्या अहवालाचा कालावधी पाच वरून दोन दिवसांवर आला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉनCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस