तरुणीला तोंडावर तेजाब फेकण्याची धमकी

By Admin | Updated: August 12, 2015 03:53 IST2015-08-12T03:53:01+5:302015-08-12T03:53:01+5:30

रुसलेल्या मैत्रिणीने लग्नास नकार दिल्यामुळे संतप्त झालेल्या एका आरोपीने तिला तोंडावर तेजाब फेकण्याची आणि

The woman threatens to throw acid in the mouth | तरुणीला तोंडावर तेजाब फेकण्याची धमकी

तरुणीला तोंडावर तेजाब फेकण्याची धमकी

नागपूर : रुसलेल्या मैत्रिणीने लग्नास नकार दिल्यामुळे संतप्त झालेल्या एका आरोपीने तिला तोंडावर तेजाब फेकण्याची आणि तिच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी दुपारी ही घटना घडली.
आरोपीचे नाव प्रफुल्ल मेश्राम आहे. तो धरमपेठेतील एका महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे तर तरुणी (वय २०) याच भागातील दुसऱ्या एका कॉलेजमध्ये शिकते. तीन वर्षांपासून या दोघांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये वितुष्ट आले. त्यामुळे मैत्रीण प्रफुल्लसोबत फटकून वागू लागली. तिला आपल्यापेक्षा दुसरा चांगला मित्र मिळाल्याचा समज झाल्यामुळे प्रफुल्ल कमालीचा अस्वस्थ आहे. त्यामुळे तो रुसलेल्या मैत्रिणीची समजूत काढण्यासाठी नेहमीच तिचा पाठलाग करतो. बोलण्याचा प्रयत्न करतो. ती प्रतिसाद देत नसल्यामुळे त्याच्या भावना जास्तच तीव्र झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवारी दुपारी ११.४५ वाजता कॉलेज आटोपून सदर तरुणी आपल्या एमआयडीसीतील घराकडे निघाली. तिचा पाठलाग करीत प्रफुल्लने तिला रस्त्यात रोखले. तिच्याजवळ जाऊन तिचा हात पकडला. ‘आपण आता लग्न करू’ असा प्रस्ताव प्रफुल्लने तिच्यासमोर ठेवला. तिने स्पष्ट नकार दिल्यामुळे तो संतापला. तू ऐकली नाही तर तुझ्या तोंडावर तेजाब फेकीन आणि तुझे हातपाय तोडीन, अशी धमकी दिली. एवढ्यावरच आरोपी थांबला नाही.

Web Title: The woman threatens to throw acid in the mouth