अन्ननलिकेत कृत्रिम दात अडकल्याने महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2022 08:00 IST2022-06-07T08:00:00+5:302022-06-07T08:00:01+5:30

Nagpur News कृत्रिम दात गिळल्याने नागपुरातील ६५ वर्षीय महिलेचा रविवारी मृत्यू झाला. तर, मुंबई येथील एका वृद्धाने कवळी गिळल्याने अन्ननलिका कापून कवळी बाहेर काढावी लागली.

Woman dies after artificial teeth get stuck in esophagus | अन्ननलिकेत कृत्रिम दात अडकल्याने महिलेचा मृत्यू

अन्ननलिकेत कृत्रिम दात अडकल्याने महिलेचा मृत्यू

ठळक मुद्देकृत्रिम दात लावले असतील तर सावध राहाकालांतराने कृत्रिम दाताच्या मापात बदल होतोच

 

नागपूर : कृत्रिम दात गिळल्याने नागपुरातील ६५ वर्षीय महिलेचा रविवारी मृत्यू झाला. तर, मुंबई येथील एका वृद्धाने कवळी गिळल्याने अन्ननलिका कापून कवळी बाहेर काढावी लागली. यामुळे कृत्रिम दात लावले असतील तर सावध राहा, हे कृत्रिम दात निघून ते अन्ननलिकेत अडकून जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

नागपुरातील ॲरिक मेरिक वँड्रिन ही महिला पाणी पीत असताना तिने नकळत नकली दात गिळला. तो अन्ननलिकेत अडकला. शुक्रवारी त्यांना मेडिकलमध्ये भरती केले. एन्डोस्कोपीद्वारे दात काढण्याचा प्रयत्नही झाला. यश आले नाही. सोमवारी शस्त्रक्रिया होणार होती. परंतु रविवारीच त्यांचा मृत्यू झाला. शस्त्रक्रियेत उशीर झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला असून, मेडिकल प्रशासनाने याची चौकशी सुरू केली आहे. अशीच एक घटना मुंबई येथे घडली. ६५ वर्षीय वृद्ध पुरुषाने अचानक कवळी गिळली. छाती आणि पोटाच्या वरील भागातील वेदनाने ते हैराण झाले. डॉक्टरांनी त्यांच्यावर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया केली. अन्ननलिका कापून कवळी बाहेर काढली. त्यांचा जीव वाचला. या दोन्ही घटनेला घेऊन पुन्हा एकदा कृत्रिम दाताचा धोका पुढे आला आहे.

- कृत्रिम दाताची अधिक काळजी घ्या

शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या कृत्रिम दंत विभागाचे प्रमुख डॉ. अरुण खळीकर म्हणाले, कृत्रिम दात हा योग्य तज्ज्ञांकडूनच तयार करून घ्यायला हवा. कालांतराने कृत्रिम दाताच्या मापात बदल होतोच. त्यामुळे दात ढिला झाला असेल तर तातडीने डॉक्टरांना दाखवून त्यात सुधारणा करून किंवा नवीन बसवायला हवे. कृत्रिम दाताची अधिक काळजी आवश्यक आहे.

- दात गिळताच उशीर नको

गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट यांच्यानुसार, कुठलीही कृत्रिम वस्तू गिळल्यास घरी विविध प्रयोग करून स्थिती आणखी गंभीर करू नये. उशीर न करताच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण, अन्ननलिकेत कृत्रिम दात किंवा इतर वस्तू अडकल्यास अन्ननलिका आकुंचन पावते. त्या ठिकाणी अल्सर होऊन ती वस्तू आणखी रुतून बसते. यामुळे अनुभव व कौशल्याच्या बळावरच एण्डोस्कोपीद्वारे बाहेर काढणे शक्य होते. तसेच ती वस्तू बाहेर काढताना श्वसन नलिकेत जाण्याचाही धोका असतो.

Web Title: Woman dies after artificial teeth get stuck in esophagus