गळफास लावून महिलेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:09 IST2021-03-10T04:09:07+5:302021-03-10T04:09:07+5:30

कुही : अज्ञात कारणावरून राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना कुही शहरातील वाॅर्ड क्र. ७ येथे शनिवारी ...

Woman commits suicide by hanging | गळफास लावून महिलेची आत्महत्या

गळफास लावून महिलेची आत्महत्या

कुही : अज्ञात कारणावरून राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना कुही शहरातील वाॅर्ड क्र. ७ येथे शनिवारी (दि. ६) रात्री ९ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

कविता ज्ञानेश्वर जिभकाटे (४५, रा. वाॅर्ड क्र. ७, कुही) असे मृत महिलेचे नाव आहे. मृत कविता हिने घराचा दरवाजा आतून बंद करून छताच्या कडीला नायलाॅन दाेरीच्या साहाय्याने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली. दरम्यान, तिला आवाज देऊनही दार उघडत नसल्याने तिच्या पतीने खिडकीतून डाेकावून पाहिले असता, ती छताला लटकलेल्या अवस्थेत आढळली. लागलीच तिच्या पतीने दरवाजा ताेडून तिला दुचाकीवरून कुही ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे तपासणीअंती डाॅक्टरांनी कविताला मृत घाेषित केले. याप्रकरणी ज्ञानेश्वर पांडुरंग जिभकाटे (५३, रा. वाॅर्ड क्र. ७, कुही) यांच्या तक्रारीवरून कुही पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, पुढील तपास पाेलीस हवालदार नामदेव पुजारी करीत आहेत.

Web Title: Woman commits suicide by hanging