आजाराला कंटाळून महिलेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 04:05 IST2020-11-29T04:05:42+5:302020-11-29T04:05:42+5:30

नागपूर : पाचपावलीतील कुख्यात गुंड सौरभ सुधीर वासनिक याच्या विरुद्ध एमपीडीए लावून पोलिसांनी त्याला कारागृहात डांबले. वासनिकविरुद्ध अनेक गंभीर ...

Woman commits suicide due to illness | आजाराला कंटाळून महिलेची आत्महत्या

आजाराला कंटाळून महिलेची आत्महत्या

नागपूर : पाचपावलीतील कुख्यात गुंड सौरभ सुधीर वासनिक याच्या विरुद्ध एमपीडीए लावून पोलिसांनी त्याला कारागृहात डांबले. वासनिकविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

---

आजाराला कंटाळून महिलेची आत्महत्या

नागपूर : वर्षभरापासून सलग उपचार घेऊनही श्वसनाच्या त्रासापासून सुटका होत नसल्यामुळे कंटाळलेल्या एका महिलेने गळफास लावून आत्महत्या केली. कविता विलास नंदेश्वर (वय ५४) असे मृत महिलेचे नाव असून ती जरीपटक्यातील आनंद मार्गावर राहत होती. शनिवारी सकाळी ९.४५ च्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

----

तरुणीचा आकस्मिक मृत्यू

नागपूर : गुरुनानक तेजबहादुर नगरात राहणारी मोनिका महेंद्र राजपूत (वय २२) हिची प्रकृती अचानक बिघडल्याने तिचा मृत्यू झाला. शनिवारी पहाटे २.४५ च्या सुमारास मोनिकाची प्रकृती अचानक बिघडली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना शनिवारी सकाळी १०.५ ला डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

----

विषारी किड्याने घेतला बळी

नागपूर : पाचपावलीतील लष्करीबाग परिसरात राहणारे प्रकाश गेंदलाल गौरव (वय ४५) यांचा विषारी किड्याने बळी घेतला. १७ नोव्हेंबरला त्यांना विषारी किडा चावला. त्यामुळे उपचाराकरिता त्यांना मेयोत दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना शनिवारी सकाळी १९ च्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

---

Web Title: Woman commits suicide due to illness