शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
2
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
3
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
4
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
5
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
6
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
7
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
8
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
9
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
10
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
11
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
12
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
13
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
14
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
15
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
16
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
17
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
18
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
19
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
20
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
Daily Top 2Weekly Top 5

राज व उद्धव ठाकरे यांना विदर्भाचा मुद्दा पटवून देऊ

By admin | Updated: April 30, 2016 06:18 IST

स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा हा शेवटी चर्चेनेच सुटणार आहे. मनसे व शिवसेनेचा याला विरोध आहे.

श्रीहरी अणे : बोलावल्यास चर्चा करण्यास तयारनागपूर : स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा हा शेवटी चर्चेनेच सुटणार आहे. मनसे व शिवसेनेचा याला विरोध आहे. परंतु राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी आपणास बोलावले तर आपण त्यांच्याशी या विषयावर कधीही चर्चा करायला तयार आहोत. विदर्भाचा मुद्दा आपण त्यांना पटवून देऊ, असे राज्याचे माजी महाधिवक्ता व विदर्भवादी नेते अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. विदर्भवादी संघटनांच्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकारांनी त्यांना मनसे व शिवसेनेच्या विरोधाबाबत विचारले असता त्यांनी उपरोक्त मत व्यक्त केले. तसेच नीतेश राणे यांनी मुंबईत अणे यांच्याविरोधात लावलेल्या होर्डिंगबाबत विचारणा केली असता त्यांच्याशीही आपण चर्चा करायला तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विदर्भाच्या आंदोलनात हिंसा होऊ नये, असे आमचे म्हणणे आहे. तसा आमचा प्रयत्नसुद्धा राहणार आहे. परंतु कुणी आमच्यावर हल्ला केलाच तर त्याचा प्रतिकार करण्यास आम्ही मागे पुढे पाहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. दिल्ली आणि अकोला येथील घटनेने ते स्पष्ट झाले असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्र दिनी संयुक्त महाराष्ट्रवादींचे कार्यक्रम आणि विदर्भवाद्यांचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर होणार आहे. त्यात काही अप्रिय घटना घडण्याच्या शक्यतेबाबत विचारले असता अणे यांनी ही बाब स्पष्टपणे नाकारली. आपापले कार्यक्रम करण्याचा सर्वांनाच अधिकार आहे. त्यामुळे यात स्पर्धेचा प्रश्नच येत नसल्याचे त्यांनी सांगितले. भाजप केंद्रामध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर बहुमतात आहे. त्यामुळे विदर्भ राज्य निर्माण करण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यासाठी विश्वसनीय पर्यायी दबाव गट निर्माण करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी) मी केवळ लोकांच्या हिताचे प्रश्न मांडत राहणार अ‍ॅड. श्रीहरी अणे यांना नेहमीप्रमाणे ते निवडणूक लढणार का आणि मुख्यमंत्री होणार का? असे प्रश्न विचारण्यात आले. त्याचे उत्तर त्यांनी याही वेळेस नाही असेच दिले. ते म्हणाले, हे प्रश्न मला नेहमीच विचारले जातात. विदर्भाच्या प्रश्नावर निवडणूक लढण्याची वेळ आली तर ती भूमिकाही पार पाडू. परंतु मी व्यक्तिगत निवडणूक लढणार नाही. माझी भूमिका ही राजकीय राहणार नसून ती लोकांच्या हिताचे प्रश्न विचारणारीच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.