शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीने स्वीकारले अनैतिक संबंध

By admin | Updated: July 28, 2015 04:07 IST

पतीसोबत १४ वर्षांपर्यंत वैवाहिक जीवन जगणाऱ्या व चार मुलांची आई झालेल्या एका महिलेने न्यायनिवाड्याच्या

पतीला घटस्फोट : हायकोर्ट म्हणाले, ही तर क्रूरतानागपूर : पतीसोबत १४ वर्षांपर्यंत वैवाहिक जीवन जगणाऱ्या व चार मुलांची आई झालेल्या एका महिलेने न्यायनिवाड्याच्या बैठकीमध्ये निर्लज्जपणे अनैतिक संबंधाची कबुली दिली. चारचौघात झालेल्या मानहानीमुळे पतीला प्रचंड मानसिक धक्का बसला. पत्नीचे असे वागणे पतीसोबतची क्रूरता असल्याचे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदविले आहे. तसेच, पतीला क्रूरतेच्या आधारावर घटस्फोट मंजूर केला आहे.न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व अनंत बदर यांनी हा निर्वाळा दिला. प्रकरणातील दाम्पत्य रमेश व रश्मी (काल्पनिक नावे) नागपूर येथील रहिवासी आहे. २१ मार्च २००६ रोजी कौटुंबिक न्यायालयाने रमेशला पत्नीची क्रूरता व विभक्ततेच्या आधारावर घटस्फोट देण्यास नकार दिला होता. यामुळे त्याने उच्च न्यायालयात अपील केले होते. ३० एप्रिल १९७९ रोजी विवाह झाल्यानंतर सप्टेंबर - १९९३ पर्यंत रश्मी चांगली वागली. यानंतर तिच्या स्वभावात अचानक बदल झाला. ती रमेशला टाळायला लागली. रमेश काही बोलायला गेल्यास तिच्या रागाचा भडका उडत होता. ती मुलांनाही विनाकारण मारत होती. तिचे शेजारच्या एका मुलासोबत अनैतिक संबंध होते. त्या मुलाच्या वडिलाने रमेशला यासंदर्भात टोकले होते. यासंदर्भात न्यायनिवाडा करण्यासाठी ५ डिसेंबर १९९५ रोजी मान्यवर व्यक्तींची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत रश्मी व त्या मुलाने अनैतिक संबंधाची कबुली दिली. यानंतर रश्मी वेगळी राहायला लागली. दरम्यान, घटस्फोट झाला नसतानाही रमेशने दुसरा विवाह केल्याची तक्रार रश्मीने पोलीस ठाण्यात नोंदविली. संबंधित न्यायालयाने रश्मीची तक्रार आधारहीन व खोटी असल्याचे निरीक्षण नोंदवून रमेशला आरोपमुक्त केले. चारही मुले रमेशसोबत राहत असून रश्मीने मुलांचा ताबा मिळण्यासाठी दावाही केलेला नाही. उच्च न्यायालयाने रमेशला घटस्फोट मंजूर करताना यासह विविध बाबी विचारात घेतल्या.(प्रतिनिधी)