शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची पराभवाची हॅटट्रिक; दिल्ली कॅपिटल्सच्या विजयासह प्लेऑफ्सच्या शर्यतीत नवं ट्विस्ट
2
अबुधाबीमध्ये मोठा ड्रोन हल्ला; न्यूक्लियर प्लँट नष्ट करण्याचा प्रयत्न; पुन्हा युद्धाचे ढग?
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान; ठरला ३१वा जागतिक पुरस्कार!
4
DC vs RR: विक्रमी अर्धशतकानंतर रियान परागचा रुबाब; सेलिब्रेशनमुळे नवा वाद, नेमकं काय घडलं?
5
रेल्वे ठेकेदारच्या हलगर्जीपणामुळे अडकली कुत्र्यांची पिल्ले, कसारा यार्डमधील विचित्र प्रकार
6
निसर्गाचा मोठा चमत्कार! भीषण ST बस अपघातात ६ महिन्यांची गरोदर महिला सुखरूप
7
'दर्जे'दार! पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा
8
ना 'डील', ना ठोस आश्वासन... डोनाल्ड ट्रम्प चीनवरून रिकाम्या हाती परतले, आता पुढे काय करणार?
9
ठाणे: मिठबंदर खाडीत बेपत्ता व्यक्तीचा शोध अखेर थांबवला; चार दिवसांपासून सुरू होते शोधकार्य
10
ST बसचा कल्याण-नगर मार्गावर भीषण अपघात! चालक, प्रवाशाचा मृत्यू; २० जण जखमी
11
युक्रेनचा मॉस्कोवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका भारतीय कामगाराचा मृत्यू, ३ जखमी
12
Vaibhav Suryavanshi Record : १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी भारताचा नवा सिक्सर किंग! अभिषेक शर्माचा विक्रम मोडला
13
३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (video)
14
PM मोदींच्या आवाहनाचा काय परिणाम झाला! किती टक्के नागरिकांनी एक वर्षं सोनं न खरेदी करण्याचा निर्णय घेतला? सर्व्हेतून मोठा खुलासा
15
RCB Qualify For IPL 2026 Playoffs : गत चॅम्पियन बंगळुरु प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ; पंजाबचा खेळ खल्लास?
16
२०५ तक्रारी, १५ कोटींची फसवणूक... देशभरातील लोकांना लुटणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश
17
Video: पुणेकरांसाठी खुशखबर..! सरकारी दरात मिळणार कॅन्सर उपचार; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू
18
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
19
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
20
शनि अमावस्येच्या रात्री दोघांची हत्या; धुळ्यात भोंदू बाबाचं कृत्य, सगळं केलं पण एका चुकीने अडकला
Daily Top 2Weekly Top 5

खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा का नोंदविला नाही?

By admin | Updated: June 17, 2014 00:46 IST

जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सुदीप जयस्वाल यांच्या तक्रारीवरून खुनाच्या प्रयत्नाचा (३०७) गुन्हा का नोंदविला नाही, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने करून याप्रकरणी

हायकोर्टाची विचारणा : जरीपटका पोलिसांवर प्रश्नचिन्ह
नागपूर : जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सुदीप जयस्वाल यांच्या तक्रारीवरून खुनाच्या प्रयत्नाचा (३०७) गुन्हा का नोंदविला नाही, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने करून याप्रकरणी जरीपटका पोलिसांना उद्या, बुधवारी उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
जयस्वाल यांनी पोलीस तक्रारीमध्ये त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला होता. परंतु, जरीपटका पोलिसांनी यासंदर्भातील गुन्हा नोंदविला नाही. आज, सोमवारी ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व चंद्रकांत भडंग यांनी उपरोक्त निर्देश दिलेत. पारदर्शक तपास होण्यासाठी संबंधित प्रकरण जरीपटका पोलिसांकडून काढून दुसऱ्या संस्थेकडे हस्तांतरित करण्यासाठी जयस्वाल यांनी उच्च न्यायालयात फौजदारी रिट याचिका दाखल केली आहे.
अ‍ॅड. जयस्वाल क्लार्क टाऊनस्थित सुंदर जीवन अपार्टमेंटमध्ये राहतात. याच अपार्टमेंटमध्ये कावेश तलवार व प्रवीण तलवार यांचा फ्लॅट आहे. तलवार बंधूंनी घराचे बांधकाम काढले होते. त्यावरून अ‍ॅड. जयस्वाल यांनी सोसायटीच्या अध्यक्षांकडे तक्रार केली होती. काही दिवसांनंतर बांधकामावरूनच अ‍ॅड. जयस्वाल व तलवार कुटुंबीयांचा वाद झाला. दरम्यान, तलवार बंधूंनी दगड मारल्यामुळे जयस्वाल यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. तत्पूर्वी जयस्वाल यांनी तलवार कुटुंबातील महिलेला अश्लील शिवीगाळ व विनयभंग केल्याचा आरोप आहे. दोन्ही पक्षांनी जरीपटका पोलिसांकडे एकमेकांविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. यावरून अ‍ॅड. जयस्वाल यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम २९४, ३५४ (अ)(४), ५०६ (ब), ३२३, तर तलवार बंधूंविरुद्ध भादंविच्या कलम २९४, ३२३, ३२५, ३५५, ५०६ (ब) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
वकिलांच्या अधिकारासाठी संघर्ष करताना याआधी जरीपटका पोलिसांसोबत अनेकदा वाद झाला. यामुळे ते पूर्वग्रहदूषित आहेत. त्यांचा तपास पारदर्शक नाही. वैद्यकीय तपासणीत हाताला दोन फ्रॅक्चर असल्याचे स्पष्ट झाले आहे. दगड मारून हत्या करण्याचा प्रयत्न झाला आहे. यानंतरही पोलिसांनी भादंविच्या कलम ३०७ (खूनाचा प्रयत्न) व २२६ अन्वये गुन्हा नोंदवला नाही. यामुळे जरीपटका पोलिसांकडून प्रकरणाचा तपास काढण्याची पोलीस आयुक्तांना मागणी केली होती, पण त्यांनी यासंदर्भात काहीच निर्णय घेतला नाही, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. फिरदोस मिर्झा यांनी कामकाज पाहिले.(प्रतिनिधी)