वासनकरने संपत्ती कुठे दडवली ?

By Admin | Updated: May 14, 2014 01:28 IST2014-05-14T00:51:52+5:302014-05-14T01:28:11+5:30

शेकडो कोटींचा गंडा घालणाऱ्या वासनकर समूहाने नेमकी किती ठेवीदारांची फसवणूक केली, त्याचा पोलीस शोध घेत आहेत. दुसरीकडे त्याने जमविलेल्या शेकडो कोटी रुपयांची विल्हेवाट कशी लावली,

Where did Vasankar stamp his wealth? | वासनकरने संपत्ती कुठे दडवली ?

वासनकरने संपत्ती कुठे दडवली ?

नागपूर : शेकडो कोटींचा गंडा घालणार्‍या वासनकर समूहाने नेमकी किती ठेवीदारांची फसवणूक केली, त्याचा पोलीस शोध घेत आहेत. दुसरीकडे त्याने जमविलेल्या शेकडो कोटी रुपयांची विल्हेवाट कशी लावली, त्याचीही पोलीस चौकशी करीत आहे. तिकडे वासनकर विरोधात तक्रारी करणार्‍यांची संख्या वाढतच आहे. आज गुन्हेशाखेत पुन्हा दोघांच्या तक्रारी तर काहींचे बयाण नोंदवून घेण्यात आले.

वेगवेगळ्या योजनांचे मृगजळ दाखवून ठेवीदारांना आकर्षित करणार्‍या प्रशांत वासनकर आणि त्याच्या साथीदारांनी हजारो गुंतवणूकदारांकडून शेकडो कोटी रुपये गोळा केले. मात्र, त्याने ज्या मुदतीनंतर परताव्याचे स्वप्न दाखविले त्या मुदतीत ठेवीदारांना रक्कम परत दिली नाही. त्याने दिलेले पोस्ट डेटेड चेकही बाऊन्स झाले आणि नेमकी कधी रक्कम परत मिळणार, त्याबाबतही समाधानकारक उत्तरे दिली जात नसल्यामुळे ठेवीदारांनी वासनकरच्या कार्यालयात आपली रक्कम परत घेण्यासाठी गर्दी केली. रक्कम देण्याऐवजी त्याच्याकडून केवळ आश्‍वासने मिळत असल्यामुळे ठेवीदार संतापले. त्यांनी पोलिसांकडे जाण्याचीही भाषा वापरली.

वासनकर आणि त्याचे साथीदार मात्र त्यांना आश्‍वासनाचेच चॉकलेट देत होते. वेगवेगळे प्रयत्न करूनही रक्कम परत मिळत नसल्याचे पाहून अखेर विवेक पाठक नामक ठेवीदाराने पोलिसांकडे तक्रार नोंदवली. त्यावरून पोलिसांनी शुक्रवारी वासनकर, त्याची पत्नी, भावासह ९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले. त्यांच्या निवासस्थानी, कार्यालयात, फॉर्महाउसमध्ये झडती घेऊन रोख, सोन्याचे दागिने आणि अन्य चिजवस्तूंसह सुमारे ७0 ते ८0 लाखांचा ऐवज आणि मोठय़ा संख्येत कागदपत्रे जप्त केली. या कागदपत्रांमधून वासनकर समूहाने किती ठेवीदारांना गंडा घातला त्याचा शोध घेतला जात आहे. त्याने गोळा केलेल्या शेकडो कोटी रुपयांमधून कुठे कुठे संपत्ती जमवली. त्याचाही पोलीस शोध घेत आहेत. वृत्त लिहिस्तोवर वासनकरला अटक झालेली नव्हती. (प्रतिनिधी)

 

Web Title: Where did Vasankar stamp his wealth?