शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नगरपालिकेला स्थायी मुख्याधिकारी मिळणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:08 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : नगरपालिकेचे मुख्याधिकारी स्वरूप खरगे यांची पाच महिन्यांपूर्वी बदली करण्यात आली आणि या पदाचा प्रभार ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : नगरपालिकेचे मुख्याधिकारी स्वरूप खरगे यांची पाच महिन्यांपूर्वी बदली करण्यात आली आणि या पदाचा प्रभार पारशिवनीनगर पंचायतच्या मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांच्याकडे साेपविण्यात आला. शासनाने या पालिकेवर स्थायी मुख्याधिकाऱ्याची नियुक्ती न केल्याने शहरातील विविध विकासकामांसाेबतच नागरिकांची महत्त्वाची कामे रखडली आहेत. त्यामुळे शहरातील काेरोना संक्रमण उपाययाेजनांच्या अंमलबजावणीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

रामटेकला पाैराणिक पार्श्वभूमी लाभल्याने ते महत्त्वाचे पर्यटनस्थळ बनले आहे. शहराचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून राज्य शासनाने विकास आराखडा तयार करून त्याअंतर्गत काही कामेही सुरू केली आहेत. मार्च २०२० पासून जिल्ह्यात काेराेना संक्रमणाला सुरुवात झाली आणि रामटेक शहरातही काेराेना रुग्ण आढळून आले. त्यातच शासनाने पालिकेचे मुख्याधिकारी स्वरूप खरगे यांच्या बदलीचे आदेश दिले. त्यांच्या जागी तातडीने स्थायी मुख्याधिकाऱ्याची नियुक्ती न करता अर्चना वंजारींकडे प्रभार साेपविला.

शहराचा विकास, जनता आणि शासन यात मुख्याधिकारी महत्त्वाचा दुवा ठरतात. अर्चना वंजारी या आठवड्यातील काही दिवस रामटेक शहरात येत असल्याने तसेच त्यांना पारशिवनी नगर पंचायतचीही कामे बघावी लागत असल्याने रामटेक पालिकेचे कामकाम व शहरातील विकासकामे यावर नियंत्रण ठेवणे व ते मार्गी लावणे यात त्यांचीही फरफट हाेत आहे. शहरात काेराेना संक्रमण असून, बहुतांश नागरिक मास्क न वापरता फिरतात. बाजारात व सार्वजनिक ठिकाणी गर्दी करतात. दंडात्मक कारवाई केली जात नसल्याने त्यांच्यावर कुणाचाही वचक राहिला नाही.

...

विविध कामे प्रभावित

पालिकेला स्थायी मुख्याधिकारी नसल्याने शहरातील अतिक्रमण हटाव माेहीम, प्लास्टिक बंदी माेहीम, काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांची अंमलबजावणी तसेच या बाबींचे उल्लंघन केल्यानंतर करावयाची दंडात्मक कारवाई थंडबस्त्यात गेली आहे. शहरात पार्किंगची माेठी समस्या असून, वाहतूक काेंडीमुळे भांडणे हाेतात. ती समस्याही जैसे थेच आहे. हा प्रकार महात्मा गांधी चाैक व बसस्थानक चाैकात सर्वाधिक घडताे. साेबतच शहरातील जलतरण प्रकल्प, राखी तलाव साैंदर्यीकरण, नळयाेजना, रस्ते दुरुस्ती, घरकुल याेजना, उद्यान दुरुस्ती, पार्किंग, तीर्थक्षेत्र विकास, घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छ शहर, सुंदर शहर अभियान, शिक्षण, आराेग्य, कर संकलन यासह अन्य बाबी प्रभावित झाल्या आहेत.