शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus in Nagpur; सर्वसामान्यांचे कधी तपासले जाणार नमुने ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 07:00 IST

खासगी हॉस्पीटलमध्ये भरती असलेल्या रुग्णांचेच नमुने घेण्याची अट असल्याने सामान्यांचे नमुने तपासणार कधी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ठळक मुद्देआणखी एका खासगी लॅबला परवानगी :केवळ भरती रुग्णांचेच नमुने घेण्यास मंजुरी

सुमेध वाघमारेनागपूर : नागपुरात ‘कोव्हीड-१९’ रुग्णांची संख्या १२७ वर गेली आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी शुक्रवारी आणखी एका खासगी प्रयोगशाळेला नमुने घेण्याची परवानगी दिली. मात्र खासगी हॉस्पीटलमध्ये भरती असलेल्या रुग्णांचेच नमुने घेण्याची अट असल्याने सामान्यांचे नमुने तपासणार कधी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मुंबईत १९ खासगी प्रयोगशाळेला नमुने घेण्याची व तपासण्याची परवानगी आहे. यातही नमुने देऊन घरी जाण्याची मुभा आहे. पॉझिटिव्ह आल्यावर रुग्णालयात दाखल केले जात आहे. यामुळे रोज मोठ्या संख्येत नमुने तपासले जात आहे. परिणामी जास्तीत रुग्ण उपचाराखाली येऊन त्यांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाइन करून त्यांचे नमुने तपासले जात आहे. नागपुरात मुंबई सारखी स्थिती नाही. परंतु रोज रुग्ण वाढत असल्याने नमुने तपासण्याची गती वाढविण्यावर वैद्यकीय तज्ज्ञ जोर देत आहेत. नागपुरात दोन लॅबला परवानगी असलीतरी त्यांच्यावर अटी लादून दिल्या आहेत. यात खासगी रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांचेच नमुने घेण्याची अट आहे. नमुने देण्यासाठी संशयिताला लॅबमध्ये येता येणार नाही. लॅबचा टेक्निशियन सुरक्षेचे सर्व साधने घालू संबंधित हॉस्पिटलमध्ये जाऊन रुग्णाचे नमुने घेईल. त्यानंतर ते नमुने मुंबईच्या प्रयोगशाळेत पाठविले जाईल. हे नमुने रुग्णवाहिकेतून किंवा रेल्वेने पाठविले जातील. एका नमुनाचे तपासणी शुल्कही साडेचार हजारावर नको, अशीही अट आहे. यामुळेच पहिल्या लॅबकडून आतापर्यंत केवळ ३० नमुने गोळा करून त्याचा अहवाल दिला आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही लॅबकडे कोरोना विषाणूची निदान करणारी यंत्रसामूग्री, जागा व तज्ज्ञ आहेत. याच धर्तीवर त्यांन नमुने तपासणीसाठी ‘आयसीएमआर’ला परवानगीही मागितली आहे. परंतु अद्यापही मिळालेली नाही. वैद्यकीय तज्ज्ञाच्य मते, खासगी लॅबला ‘ओपीडी’ स्तरावर नमुने घेण्याची परवानगी मिळाल्यास मोठ्या प्रमाणात नमुने तपासले जाऊ शकतील. महत्त्वाचे म्हणजे, जी व्यक्ती संशयित आहे, परंतु त्याला मेयो, मेडिकलमध्ये जाण्याची भिती वाटते, त्यांच्यासाठी खासगी लॅब सोयीचे ठरेल. शासनाने यावर तातडीने निर्णय घेणे आवश्यक असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस