शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातून उड्डाण घेताना एअर अ‍ॅम्ब्युलन्सचे चाक तुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:09 IST

विमानाच्या दोन तास आकाशात घिरट्या नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी सायंकाळी इंधन भरण्यासाठी उतरलेल्या एअर अ‍ॅम्ब्युलन्सचे ...

विमानाच्या दोन तास आकाशात घिरट्या

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी सायंकाळी इंधन भरण्यासाठी उतरलेल्या एअर अ‍ॅम्ब्युलन्सचे एक चाक मुंबईकडे उड्डाण भरल्यानंतर धावपट्टीवर अचानक पडले. यासंदर्भात चालक दल अनभिज्ञ होते. नागपूर विमानतळाने या घटनेची माहिती वैमानिकाला दिली. त्यानंतर हे विमान मुंबई विमानतळावर सुखरूप उतरले. चाक का पडले, याचे कारण समजू शकले नाही.

मुंबई विमानतळावर उतरण्यापूर्वी हे विमान दोन तास आकाशात घिरट्या घालत होते. त्यानंतर वैमानिकाने अत्यंत कौशल्याने विमान धावपट्टीवर उतरविले. त्यावेळी कुठलीही अनुचित घटना घडली नाही. विमानातील रुग्ण, डॉक्टर आणि क्रू मेंबर सुखरूप आहेत.

प्राप्त माहितीनुसार, गुरुवारी दुपारी पश्चिम बंगालच्या दुर्गापूर येथून मुंबईकरिता जेट सर्व्हिसेस प्रा.लि.च्या सी९० अ‍ॅम्ब्युलन्स विमानाने रुग्णाला घेतले. विमानात त्याच्यासह पॅरामेडिकल स्टाफ, एक डॉक्टर व विमानाचे दोन वैमानिक होते. सायंकाळी ५.०५ वाजता इंधन भरण्यासाठी विमान नागपूर विमानतळावर उतरले. इंधन भरल्यानंतर मुंबईकडे उड्डाण भरल्यानंतर विमानाचे एक चाक धावपट्टीवर पडले. तोपर्यंत विमान आकाशात झेपावले होते. या घटनेची सूचना नागपूर विमानतळाने वैमानिकाला दिली. त्याचवेळी वैमानिकाने मुंबईत विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्याचा निर्णय घेतला. स्थिती अत्यंत गंभीर होती. वैमानिकाने मुंबई हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून बेली लँडिंगची परवानगी मागितली. धावपट्टीवर आवश्यक उपाययोजना केल्यानंतर विमान उतरविण्यास परवानगी देण्यात आली. विमान मुंबई विमानतळावर उतरण्यापूर्वी दोन तास आकाशात घिरट्या घालत होते. त्यानंतर रात्री ९.१५ वाजता उतरविण्यात आले.