शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
2
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
3
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
4
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
5
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
6
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
7
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
8
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
9
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
10
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
11
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
12
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
13
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
14
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
15
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
16
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
17
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
18
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
19
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
20
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचा योग्य सन्मान व्हावा

By admin | Updated: June 6, 2017 01:52 IST

औद्योगिक क्षेत्राने पाण्याचा वरवर विचार न करता पाण्याचा गांभीर्याने वापर, पुनर्वापर, प्रकिया इत्यादी बाबींसह जमिनीत जलसाठा वाढविण्यावर भर देणे गरजेचे आहे

जलतज्ज्ञ राजेंद्र्र सिंग : पर्यावरण दिनानिमित्त तज्ज्ञांचे विचारमंथनलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :औद्योगिक क्षेत्राने पाण्याचा वरवर विचार न करता पाण्याचा गांभीर्याने वापर, पुनर्वापर, प्रकिया इत्यादी बाबींसह जमिनीत जलसाठा वाढविण्यावर भर देणे गरजेचे आहे याकरिता शासनावर अवलंबून न राहता ही लोकचळवळ व्हावी, असे मत प्रसिद्ध जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र्र सिंग यांनी व्यक्त केले. जागतिक पर्यावरणदिनाच्या निमित्ताने महानिर्मितीच्यावतीने औष्णिक वीज केंद्र्रातील रसायनशास्त्र व शाश्वत पर्यावरण या विषयावर हॉटेल तुली इम्पिरियल येथे आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महानिर्मितीचे कार्यकारी संचालक कैलाश चिरुटकर, मुख्य अभियंता जयंत बोबडे, मुख्य महाव्यवस्थापक नितीन वाघ, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, श्रीपाल सिंग, दौलत शिवणकर, डॉ. विजय येऊल प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. राजेंद्र्र सिंग म्हणाले की, पावसाच्या पॅटर्नची पिकांच्या पॅटर्नसोबत सांगड घातली तर उत्पादन वाढेल. निसर्गाचे शोषण न करता पोषण केल्यास विकास साधता येईल. राजस्थानमध्ये जलक्रांती घडवून आणल्याचे त्यांनी उदाहरणासह अनेक दाखले दिले. पाणी हेच जीवन आहे, पाण्याचा शांत गुणधर्म आहे, पाणी एकमेकांना जोडण्याचे काम करते, त्यामध्ये विनम्रता आहे, त्याचा योग्य सन्मान केला पाहिजे, पाण्याची १० वैशिष्ट्ये त्यांनी विशद केली.यावेळी महाजेम्सचे संचालक सुधीर पालीवाल, महानिर्मितीचे मुख्य अभियंते प्रदीप शिंगाडे,अनंत देवतारे, राजकुमार तासकर, राजेश पाटील, सुनील आसमवार, मुख्य महाव्यवस्थापक (सुरक्षा) रानडे, उप मुख्य अभियंते अनिल आष्टीकर, मोहन आव्हाड, शांताराम पौनीकर, अधीक्षक अभियंते डॉ. अनिल काठोये, श्याम राठोड, अधीक्षक रसायनशास्त्रज्ञ विवेक घोडमारे, संदेश मोरे, सुरेंद्र निशानराव, शशिकांत वेले आदी उपस्थित होते. महानिर्मितीचे कार्यकारी संचालक कैलाश चिरुटकर यांनी महानिर्मितीच्या विविध क्षेत्रातील वाटचालीबाबत उपस्थितांना माहिती दिली. मुख्य अभियंता जयंत बोबडे यांनी प्रास्ताविक केले. संचालन डॉ. मनीषा बोरीकर यांनी तर दौलत शिवणकर यांनी आभार मानले.कार्यक्षमता वाढ व स्थिरता परिषदेच्या दुसऱ्या सत्रात ‘कार्यक्षमता वाढ व स्थिरता’ या विषयावर नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, ‘सांडपाण्यावर प्रक्रिया करून वीज उद्योगात वापर’ यावर आनंद आभारे , डॉ. साधना रायलू, डॉ. श्रीपाल सिंग, श्रीनिवास नागराजन, डॉ. सीमा श्रीवास्तव, डॉ. टी.डी. कोसे, डॉ.आर.आर.खापेकर, डॉ.पद्मा राव यांनी अभ्यासपूर्ण संगणकीय सादरीकरण केले.