शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘वेटिंग’ने व्यापून टाकला मे महिना सर्वच रेल्वेगाड्या फुल्ल

By admin | Updated: May 9, 2014 00:12 IST

नागपूर : मुलांना उन्हाळ्याच्या सुट्या लागणार असल्यामुळे पालकांनी आधीच प्रवासाची ‘प्लॅनिंग’ केली. यामुळे नागपुरातून सुटणार्‍या आणि नागपूरमार्गे जाणार्‍या सर्वच रेल्वेगाड्यात मे .....

उन्हाळी सुट्यांमुळे चारही दिशांच्या गाड्यात गर्दी

नागपूर : मुलांना उन्हाळ्याच्या सुट्या लागणार असल्यामुळे पालकांनी आधीच प्रवासाची ‘प्लॅनिंग’ केली. यामुळे नागपुरातून सुटणार्‍या आणि नागपूरमार्गे जाणार्‍या सर्वच रेल्वेगाड्यात मे महिन्यात वेटिंगची स्थिती पाहावयास मिळत आहे. उन्हाळ्याच्या सुट्यात मुलांना पर्यटन, नातेवाईकांकडे जायला आवडते. त्यासाठी पालक आधीच तिकिटांचे आरक्षण करतात. यामुळे नागपुरातून सुटणार्‍या सर्वच रेल्वेगाड्यात संपूर्ण मे महिनाभर वेटिंगची स्थिती आहे. मुंबईकडील गाड्यात विदर्भ एक्स्प्रेसचा एसी फर्स्ट क्लास ३ जूनपर्यंत, एसी सेकंड १७ जूनपर्यंत, एसी थर्ड २३ जूनपर्यंत आणि स्लीपर क्लास १६ जूनपर्यंत फुल्ल आहे. दुरांतो एक्स्प्रेसचा एसी फर्स्ट १९ मेपर्यंत, एसी सेकंड २७ मेपर्यंत, एसी थर्ड २८ मेपर्यंत आणि स्लीपरक्लास २९ मेपर्यंत हाऊसफुल्ल आहे.

सेवाग्रामचा एसी फर्स्ट ३ जूनपर्यंत, एसी सेकंड ४ जूनपर्यंत आणि स्लीपरक्लास २९ मेपर्यंत वेटिंग आहे. पुण्याकडील गाड्यात नागपूर-पूणे एक्स्प्रेसमध्ये एसी फर्स्ट, सेकंड आणि स्लीपरक्लास १६ जूनपर्यंत फूल्ल आहे. नागपूर-पुणे गरीबरथही १६ जूनपर्यंत फुल्ल आहे. अमरावती-जबलपूर एक्स्प्रेसमध्येही १६ मेपर्यंत वेटिंग आहे. नागपूर-कोल्हापूर एक्स्प्रेसचे सर्व कोच १० जूनपर्यंत फुल्ल आहेत. नागपूर-अहमदाबाद प्रेरणा एक्स्प्रेसही जूनपर्यंत हाऊसफुल्ल आहे. नागपूर-इंदूर एक्स्प्रेसमध्येही तीच स्थिती आहे. दिल्ली मार्गावर जीटी एक्स्प्रेसमध्ये जुलै महिन्यापर्यंत ‘नो रूम’, तामिळनाडू एक्स्प्रेसमध्येही ‘नॉट अ‍ॅव्हेलेबल’ची सूचना मिळत आहे.

दक्षिण एक्स्प्रेसही २७ जूनपर्यंत फुल्ल आहे. चेन्नईकडील गाड्यात तामिळनाडू एक्स्प्रेस १७ जूनपर्यंत वेटिंग, ग्रॅण्ड ट्रंक एक्स्प्रेस २४ जूनपर्यंत हाऊसफुल्ल आहे. जयपूर-मद्रास एक्स्प्रेसही २६ मेपर्यंत वेटिंग आहे. बंगळुरूकडील गाड्यात निजामुद्दीन-बंगळुरू राजधानी ३० जूनपर्यंत हाऊसफुल्ल आहे. जयपूर-म्हैसूर एक्स्प्रेस २६ जूनपर्यंत फुल्ल आहे. संघमित्रा एक्स्प्रेसमध्येही २३ जूनपर्यंत वेटिंग आहे. हैदराबादकडे जाणार्‍या गाड्यात आंध्र प्रदेश एक्स्प्रेस २७ मेपर्यंत वेटिंग आहे. दक्षिण एक्स्प्रेसमध्येही २६ जूनपर्यंत वेटिंग आहे. पटना-सिकंदराबाद एक्स्प्रेसही १३ जूनपर्यंत फुल्ल आहे. हावडाकडील गाड्यात गीतांजली एक्स्प्रेसमध्ये नॉट अ‍ॅव्हेलेबलची स्थिती असून, आझादहिंद एक्स्प्रेसही २९ जूनपर्यंत फुल्ल आहे. एलटीटी-हावडा ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसही २४ जूनपर्यंत वेटिंगवर आहे. जयपूरकडे जाणार्‍या गाड्यात जयपूर एक्स्प्रेस जुलै महिन्यापर्यंत, नागपूर-सिकंदराबाद एक्स्प्रेस १७ जूनपर्यंत वेटिंगवर आहे. एकंदरीत सर्वच दिशांना जाणार्‍या रेल्वेगाड्यात मे महिनाभर वेटिंग आहे. (प्रतिनिधी)