शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

मतदान होत नाही, तरी दिला व्हीप

By admin | Updated: June 3, 2017 01:45 IST

नामनिर्देशित (स्वीकृत) नगरसेवकांची निवड ही कधीही मनपा सभागृहात मतदानाच्या आधारे होत नाही.

स्वीकृत सदस्याचा वाद : काँग्रेस नगरसेवकांमध्ये असंतोष राजीव सिंग । लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नामनिर्देशित (स्वीकृत) नगरसेवकांची निवड ही कधीही मनपा सभागृहात मतदानाच्या आधारे होत नाही. गटनेत्यांच्या माध्यमातून आलेल्या नावांच्या आधारे निवड केली जाते. काँग्रेसतर्फे स्वीकृत सदस्यासाठी दोघांचे नाव आले. दरम्यान गटनेतेही बदलले. यामुळे काँग्रेसच्या नामनिर्देशित नगरसेवकाच्या नावावर निर्णय होऊ शकला नाही. मात्र, स्वीकृत सदस्यासाठी सध्याचे विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्या आदेशावर प्रभाग ३८ चे नगरसेवक व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव प्रफुल्ल गुडधे यांनी ३१ मे रोजी काँग्रेसच्या सर्व २९ नगरसेवकांना एक व्हीप जारी केल्याची माहिती समोर आली आहे. गुडधे यांनी जारी केलेल्यया या व्हीप मध्ये म्हटले आहे की, तानाजी वनवे यांच्या आदेशानुसार व्हीप जारी केला जात आहे. त्यांनी मला प्रतोद नियुक्त केले असून काँग्रेसच्या नगरसेवकांना स्वीकृत सदस्यासाठी किशोर जिचकार यांच्या बाजूने मतदान करायचे आहे. १ जून रोजी होणाऱ्या मनपाच्या सर्वसाधारण सभेत जे नगरसेवक अनुपस्थित राहतील, त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र लोकल अ‍ॅथॉरिटी मेंबर डिसक्वॉलिफिकेशन अ‍ॅक्ट १९८६ अंतर्गत करवाई करण्यात येईल, असेही व्हीपमध्ये स्पष्ट करण्यात आले होते. विशेष म्हणजे प्रफुल्ल गुडधे हे अनुभवी नगरसेवक आहेत. तरीही या प्रकारे व्हीप जारी केला. यातूनन ते काय संदेश देऊ इच्छितात, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. व्हीप इंग्रजीत लिहिलेला होता. अनेक नगरसेवकांना चांगल्या प्रकारे इंग्रजी येत नाही. तरीही कसेबसे त्यांनी त्याचा अर्थ समजून घेतला. इतकेच नव्हे तर विरोधी पक्ष नेते पदावरून हटविण्यात आलेले संजय महाकाळकर यांनाही हा व्हीप पाठवून त्यांना किशोर जिचकार यांच्या बाजूने मतदान करण्यास सांगण्यात आले. परंतु गुरुवारी मनपा सभेत काँग्रेस दोन गटात विभागल्याचे चित्र दिसून आले. प्रदेश काँग्रेस गप्प का ? विशेष म्हणजे, इतके सर्व होऊनही प्रदेश काँग्रेसकडून कोणताही निर्णय घेतला जात नाही. नगरसेवक उघडपणे बोलण्यास तयार नाहीत. मात्र गेल्या १५ दिवसांपासून मनपात काँग्रेस नगरसेवकांमध्ये द्वंद सुरू आहे. ते थांबवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण कुठलेही पाऊल का उचलत नाहीत, असा प्रश्न या नगरसेवकांनी उपस्थित केला आहे. अशी आहे प्रक्रिया नगरसेवकांच्या संख्येच्या आधारावर ‘वेटेज पॉर्इंट’ काढले जातात. या आधारावर नामनिर्देशित नगरसेवकांची निवड प्रक्रिया सुरू होते. मनपा आयुक्त पक्षाच्या गटनेत्यांना बोलावून वेटेज पॉर्इंटच्या आधारावर नामनिर्देशित सदस्यांची संख्या निश्चित करतात. नंतर त्यानुसार अर्ज करायला सांगितले जाते. मनपा आयुक्त नमनिर्देशित नगरसेवकांचे अर्ज स्वीकारतात. दुसऱ्या दिवशी आयुक्त नामनिर्देशित नगरसेवकांची घोषणा करतात. मनपा सभागृहात नामनिर्देशित नगरसेवकांच्या नावाचा उल्लेख केला जातो. पक्षविरोधी घडामोडी, तक्रार केली आहे - विकास ठाकरे काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी सांगितले की, नामनिर्देशित नगरसेवकांच्या नावावर आयुक्त निर्णय घेतात. मतदान होत नाही. व्हीप जारी करण्याचा अधिकार पक्षाला आहे. पक्षाच्या निर्देशानुसारच गटनेता तो जारी करीत असतो. परंतु काँग्रेसतर्फे असा कुठल्याही प्रकारचा व्हीप जारी करण्यास सांगण्यात आलेले नाही. तसेच प्रफुल्ल गुडधे यांना प्रतोदसुद्धा बनविण्यात आलेले नाही. कोणत्याही नगरसेवकाला अपात्र घोषित करण्याची धमकी देणे शिस्तभंग आहे. या प्रकरणी प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्याकडे तक्रार करण्यात आलेली आहे. नियमानुसारच जारी केले व्हीप - तानाजी वनवे मनपा विरोधी पक्षनेते तानाजी वनवे म्हणाले, मनपात काँग्रेसच्या गटनेत्यांची निवड नगरसेवक करतात. गटनेत्याच्या नात्याने प्रतोद म्हणून प्रफुल्ल गुडधे यांना नियुक्त करण्यात आले आहे. प्रतोदला व्हीप जारी करण्याचे अधिकार आहेत. पक्षातर्फे व्हीप जारी होत नाही. नामनिर्देशित नगरसेवकांसाठी सभागृहात मतदान होत नाही, याची माहिती आम्हालाही आहे. परंतु सावधगिरी म्हणून व्हीप जारी करण्यात आले आहे.