शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात घडणार आदिवासी संस्कृतीचे दर्शन

By admin | Updated: August 9, 2015 02:50 IST

आदिवासी जीवन, कला व संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या मौल्यवान व दुर्मिळ वस्तूंचा संग्रह,

सिव्हिल लाईनमध्ये गोंडवाना संग्रहालयाचे निर्माण : जागतिक आदिवासी दिन मंगेश व्यवहारे  नागपूरआदिवासी जीवन, कला व संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या मौल्यवान व दुर्मिळ वस्तूंचा संग्रह, आदिवासींचे दागदागिने, देवदेवता, मुखवटे, दैनंदिन वापराच्या वस्तू, शेतीसाठी वापरण्यात येणारी हत्यारे, त्यांचे पोशाख आदी साहित्याचे जतन करण्यासाठी नागपुरात गोंडवाना संग्रहालयाच्या निर्मितीला शासनाने मंजुरी दिली आहे. सिव्हिल लाईन परिसरातील ५.५ एकर जागेवर गोंडवाना आदिवासी सांस्कृतिक संग्रहालयाचे निर्माण होणार असून, बांधकामासाठी २१ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. नष्ट होत चाललेल्या आदिवासी संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी आदिवासी विभागाचा हा प्रयत्न आहे. डिसेंबर २०१३ मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते संग्रहालयाच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले होते. येथे संग्रहालयाबरोबर प्रशिक्षण उपकेंद्राचेही निर्माण होणार आहे. सिव्हिल लाईन येथील अप्पर आयुक्तांच्या ‘गोंडवन’ बंगल्याला तोडून ही भव्य इमारत बांधण्यात येणार आहे. संग्रहालय स्थापन करण्यासाठी व शासनास शिफारशी करण्यासाठी एक विशेष समिती स्थापन करण्यात आली होती. मौजा चिखली येथील जागा या संग्रहालय व उपकेंद्रासाठी सुचविण्यात आली होती. मात्र नागपूर शहरापासून दूर असल्याने या जागेबाबत प्रस्ताव बारगळला होता. त्यानंतर आदिवासी अप्पर आयुक्तांच्या अखत्यारितील सिव्हिल लाईन्स परिसरात जागा या संग्रहालयासाठी सुचविण्यात आली होती. संग्रहालयाच्या उभारणीसाठी जागेची पाहणी आदिवासी विकास विभागाचे सचिव व आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणेचे आयुक्तांनी यांनी महिनाभरापूर्वीच केली आहे. त्याबाबतचा प्रस्ताव ३० जूनला शासनाकडे पाठविण्यात आला होता. त्यानुसार नागपुरात गोंडवाना आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय आणि प्रशिक्षण उपकेंद्राचे बांधकाम करण्यास आदिवासी विकास विभागाने परवानगी दिली आहे. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्याकडे या संग्रहालयाचा नकाशा, वास्तू आराखडा तयार करणे व इतर कामांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या वतीने २०१४ मध्ये १० व २०१५ मध्ये ११ कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यातून बांधकामाचा खर्च करण्यात येणार आहे.