शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील धरमपेठेत हिंस्र श्वानांची दहशत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 00:21 IST

मुलीला शाळेत सोडण्यासाठी गेलेल्या वडिलावर आणि मुलीवर धरमपेठ भागात पाच-सहा श्वानांच्या घोळक्याने हल्ला चढवत, दोघांनाही जखमी केले आहे.

ठळक मुद्दे वडील आणि मुलीवर हल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात बेवारस श्वानांनी धुमाकूळ घातला असून, नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या असतानाही, प्रशासनाला बेवारस श्वानांचा बंदोबस्त करता आलेला नाही. त्याच पार्श्वभूमीवर मुलीला शाळेत सोडण्यासाठी गेलेल्या वडिलावर आणि मुलीवर धरमपेठ भागात पाच-सहा श्वानांच्या घोळक्याने हल्ला चढवत, दोघांनाही जखमी केले आहे. मनात धडकी भरेल, अशा या जखमा आहेत.रामनगर येथील विकास रामदास पुंड यांची मुलगी अंशिका धरमपेठेतील बिशप कॉटन स्कूलमध्ये शिकते. तिला शाळेत पोहोचवून देण्यासाठी गेले असता, तेथील दूध डेअरीपुढे असलेल्या पाच-सहा श्वानांनी अचानक दोघांवरही हल्ला चढवला. या हल्ल्यात ते थोडक्यात बचावले असले तरी, दोघांच्याही मानेवार, डोक्यावर आणि पायावर जबर जखमा झाल्या आहेत. चवताळलेल्या श्वानांच्या या हल्ल्याची स्थिती आणखी बिकट होऊ शकली असती. मात्र, विकास यांनी प्रतिकार केल्यामुळे ते थोडक्यात बचावले. मोकाट श्वानांचा बंदोबस्त लावण्यासाठी प्रशासन कायम अपयशी ठरले आहे. याबाबत अनेकदा नागरिकांकडून तक्रारी करण्यात आल्या असतानाही, त्याबाबत महापालिकेकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. या घटनेने धास्तावलेल्या विकास पुंड यांनी मोकाट श्वानांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :dogकुत्राnagpurनागपूर