नरेंद्रनगरात गावठी पिस्तूल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:20 IST2021-01-08T04:20:26+5:302021-01-08T04:20:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - गुन्हे शाखेच्या पथकाने नरेंद्रनगरातील एका गुंडाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तूल जप्त केले. ...

Village pistol seized in Narendranagar | नरेंद्रनगरात गावठी पिस्तूल जप्त

नरेंद्रनगरात गावठी पिस्तूल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - गुन्हे शाखेच्या पथकाने नरेंद्रनगरातील एका गुंडाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तूल जप्त केले. किडनी ऊर्फ प्रतीक राम सरवरे (वय २७) असे आरोपीचे नाव आहे. रविवारी दुपारी ३.५५ वाजता पोलिसांनी ही कारवाई केली.

आरोपी प्रतीक नरेंद्रनगरातील कंटेनर डेपोजवळच्या सुंदरबन सोसायटीत राहतो. तो गुन्हेगारी वृत्तीचा आहे. रविवारी दुपारी तो परिसरातील पिंपळाच्या झाडाजवळ पिस्तूल घेऊन उभा असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट - १ मधील पथकाला मिळाली. त्यावरून पोलिसांनी तेथे छापा घातला. आरोपीला घेराव घालून ताब्यात घेण्यात आले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक विदेशी वाटणारी पिस्तूल पोलिसांना सापडली. तपासणीअंती ती कंट्रीमेड (गावठी) असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी ती जप्त करून आरोपी प्रतीकला आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून अजनी पोलिसांच्या हवाली केले. आरोपीने ही पिस्तूल कुठून आणली. तो ती विकणार होता की कोणता गुन्हा करणार होता, त्याची आता पोलीस चौकशी करीत आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय तलवारे, सहायक निरीक्षक संकेत चौधरी, गणेश पवार, हवालदार नरेश सहारे, हेमंत लोणारे,आशिष देवरे, आनंद यादव, राहुल इंगोले, मंगेश मडावी, सुशील, दिगांबर दहातोंडे आणि योगेश सेलूकर यांनी ही कामगिरी बजावली.

---

Web Title: Village pistol seized in Narendranagar