शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भाची प्रतिरूप विधानसभा नागपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2016 03:00 IST

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या आंदोलनाचा एक भाग म्हणून विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने गेल्यावर्षीप्रमाणे

विदर्भ राज्य आंदोलन समितीचा पुढाकार : तयारीचा आढावानागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या आंदोलनाचा एक भाग म्हणून विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही ३ व ४ आॅक्टोबर रोजी विदर्भाची प्रतिरूप विधानसभा नागपुरात भरविण्यात येणार आहे. सोबतच अखंड महाराष्ट्राच्या विधानसभेला विरोध करणार असून ५ डिसेंबर रोजी विधानभवनावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. डॉ.वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित या दोन दिवसीय प्रतिरूप विधानसभेच्या पूर्व तयारीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या गिरीपेठ येतील मुख्य कार्यालयात कार्यकारिणीची बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रभाकरराव कोहळे होते. समितीचे मुख्य संयोजक राम नेवले, महिला आघाडीच्या अध्यक्षा अ‍ॅड. नंदा पराते, अरविंद देशमुख, धर्मराज रेवतकर, अरुण केदार, श्याम वाघ, अनिल तिडके, दिलीप नरवडिया, विष्णू आष्टीकर, डॉ. दीपक मुंडे, चंद्रकांत पांडे आदी प्रमुख्याने उपस्थित होते. दोन दिवसाच्या विदर्भाच्या विधानसभेमध्ये विदर्भाच्या विकासाचे मॉडेल सादर करण्यात येणार आहे. विदर्भ राज्याच्या फायद्याचा अर्थसंकल्प मांडून विदर्भ राज्य कसे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे, हे सांगण्यात येणार आहे. सोबतच विदर्भात औद्योगिकीकरण व रोजगार कसे वाढेल, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, नक्षलवाद, कुपोषण कसे संपेल, ११ ही जिल्ह्यांचा संतुलित विकास कसा होईल, विदर्भातील विजेचे लोडशेडिंग संपवून विजेचे दर निम्म्यावर कसे आणल्या जातील याचाही निर्णय या विधानसभेत होईल. विदर्भ राज्य हे देशातील नंबर एकचे प्रगतीशील राज्य कसे होऊ शकते हेही या विधानसभेत मांडल्या जाईल, असे यावेळी सांगण्यात आले. महाराष्ट्र राज्याची विधानसभा ५ डिसेंबरला नागपूरला भरेल, त्या विधानसभेला विदर्भ राज्य आंदोलन समिती विरोध करणार आहे. यासाठी विधानभवनावर मोर्चा काढण्यात येईल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. बैठकीला भीमराव फुसे, चंद्रकांत पांडे, तुकाराम घुमे, बाबा राठोड, मोहन राठी, अरुण खंगार, सुधा पावडे, वसंतराव वैद्य, अभय चैधरी, दिलीप कोहळे, बाबुराव गेडाम, बंडू कुहिटे, विनायक खोरगडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)जनजागृतीसाठी विदर्भात ३०० सभाविदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या जनजागृतीसाठी विदर्भात ३०० सभा घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. सिंदखेडराजा, कालेश्वर गडचिरोली, उमरखेड, गाडगेबाबांचे जन्मगाव शेंडगाव (अकोला), देवरी (गोंदिया) येथून विदर्भ दिंडी काढण्यात येईल. विदर्भ राज्याचा गजर करीत या दिंड्या ५ डिसेंबरला नागपुरात पोहोचतील.