शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भाचा निर्णय घ्यावाच लागेल

By admin | Updated: May 15, 2016 02:41 IST

काँग्रेसचा विदर्भाच्या मागणीला विरोध नाही. पण विदर्भ विकसित हवा की अविकसित याचाही विचार होणे आवश्यक आहे.

अविनाश पांडे : तमाशातून विदर्भ मिळणार नाहीनागपूर : काँग्रेसचा विदर्भाच्या मागणीला विरोध नाही. पण विदर्भ विकसित हवा की अविकसित याचाही विचार होणे आवश्यक आहे. आज ना उद्या छोट्या राज्यांकडे जावे लागेल. अर्थातच विदर्भाचाही निर्णय घ्यावाच लागेल, असे मत अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सचिव खासदार अविनाश पांडे यांनी शनिवारी केले. टिळक पत्रकार भवन येथे आयोजित ‘मिट द प्रेस’ कार्यक्रमात ते बोलत होते.स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसंदर्भात विदर्भातील लोकांच्या भावनाही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. तमाशातून विदर्भ मिळणार नाही. याबाबत सकारात्मक विचार करण्याची गरज आहे. शिक्षण, उद्योगासोबतच विकासाचा कालावधी निर्धारित करावा लागेल. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यापासून मिळणारा महसूल व विदर्भातून प्राप्त होणारे उत्पन्न याचाही विचार होणे गरजेचे आहे. भाजपने जाहीरनाम्यात विदर्भाचे आश्वासन दिले होेते. परंतु गेल्या दोन वर्षात त्यांनी या दृष्टीने कोणती पाऊ ले उचलली, असा सवाल त्यांनी प्रश्नाच्या उत्तरात केला.४ जुलैला राज्यसभेच्या सदस्यत्वाचा कार्यकाळ संपत आहे. पक्षश्रेष्ठींनी पक्षसंघटनेची सोपविलेली जबाबदारी पार पाडण्याचा मी प्रयत्न केला. आसाम, राजस्थान, गुजरात, त्रिपुरा, कर्नाटक या राज्यातील विधानसभा निवडणुकीची जबाबदारी सांभाळण्याची संधी पक्षाने दिली. सर्वसामान्यांच्या हिताची कामे करण्याचा प्रयत्न केला. सहा वर्षात ३२ कोटींच्या खासदार निधीपैकी २० कोटी महाराष्ट्रातील शहरी भागासाठी तर १२ कोटी ग्रामीण भागाच्या विकासासाठी वापरलेले आहे. हा निधी जनहिताच्या कामावर खर्च के ल्याची माहिती पांडे यांनी दिली. जनतेचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी वेळोवेळी संसदेच्या व्यासपीठाचा वापर केला. यात नागपूर-नागभीड ब्रॉडगेज रूपांतरण प्रकल्प, नागनदीचे पुनरुज्जीवन, नागपूर मेट्रो आदी जिव्हाळ्याच्या विषयाचा समावेश होता. महिला, शिक्षण, नैसर्गिक आपत्ती, कृषी, क्रीडा, पर्यावरण,आरोग्य, शहरी व ग्रामीण विकास, जलसंधारण, रस्ते, पूल व भवन अशा विविध क्षेत्रातील समस्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, जोसेफ राव, नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, दीपक पटेल, प्रदेश काँग्रेसचे सचिव रवींद्र दरेकर, नितीन कुंभलकर, किशोर जिचकार, प्रवीण दरेकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)फिटनेस मुव्हमेंट‘हेल्थ इज वेल्थ’ या उक्तीनुसार नागपूर शहरातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे. त्यांना विविध आजारांवर मात करता यावी, यासाठी नागपूर फिटनेस मुव्हमेन्टच्या माध्यमातून शहरातील ७९ उद्यानात ग्रीन जीमची व्यवस्था उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी उद्यानात व्यायामाची साधने उपलब्ध करण्यासाठी तीन कोटींचा निधी उपलब्ध केला असून देखभाल करण्याची जबाबदारी महापालिका व नासुप्रने स्वीकारली असल्याचे पांडे यांनी सांगितले.