दोन दिवस सुट्टी, आता तीन दिवस येलाे अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 11:15 AM2023-08-02T11:15:22+5:302023-08-02T11:15:52+5:30

मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाचा अंदाज

Vidarbha on yellow alert for three days; Forecast of light to moderate rain with thunder, lightning | दोन दिवस सुट्टी, आता तीन दिवस येलाे अलर्ट

दोन दिवस सुट्टी, आता तीन दिवस येलाे अलर्ट

googlenewsNext

नागपूर : दाेन दिवस शांत राहिलेला पाऊस पुन्हा सक्रिय हाेण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने, राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भातही याचा प्रभाव जाणवेल आणि मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस हाेण्याचा अंदाज असून, येलाे अलर्ट जारी करण्यात आला आहे.

२९ जुलैपर्यंत विदर्भातील बहुतेक भागांत जाेरदार पावसाने हजेरी लावली हाेती. त्यामुळे अमरावती व अकाेला वगळता सर्व जिल्ह्यात पाऊस सरासरीपेक्षा अधिक झाला आहे. या दाेन जिल्ह्यांत स्थिती सामान्य असली, तरी सरासरी १४ व ९ टक्क्यांनी कमी आहे. विदर्भात आतापर्यंत ५३३.३ मिमी पाऊस झाला असून, सरासरीपेक्षा ८ टक्के अधिक आहे. ३० व ३१ जुलैला संपूर्ण विदर्भात पावसाने उसंत घेतली. बदललेल्या वातावरणीय स्थितीमुळे यापुढचे दाेन दिवस विजा व मेघगर्जनेसह हलका पाऊस हाेण्याची शक्यता आहे. बुलढाणा व वाशिम वगळता सर्व जिल्ह्यात ३ ऑगस्टपर्यंत येलाे अलर्ट दिला आहे. त्यानंतर, पुन्हा उघडीप मिळण्याचा अंदाज आहे.

१० वर्षांत पाऊस सरासरीपेक्षा अधिकच

ऑगस्ट महिन्यातील वातावरण जुलैप्रमाणेच असते व पावसाचे प्रमाणही जवळपास सारखे असते. या महिन्यात पावसाचे सरासरी १३ दिवस असून, सरासरी २७७ मिमी पाऊस हाेताे. बंगालच्या खाडीत हाेणाऱ्या बदलानुसार, कमी-अधिक पावसाची शक्यता असते. १०० वर्षांपूर्वी १९२५ साली ऑगस्टमध्ये सर्वाधिक ५९५ मिमी पाऊस नागपुरात झाला हाेता. २०१३ पासून १० वर्षांचा आलेख पाहिल्यास २०१४, २०१६, २०१८ व २०२१ साली सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला, तर २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२२ ला सरासरी ३२५ मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला. २०२० साली सर्वाधिक ४४३.७ मिमी पाऊस झाला हाेता.

Web Title: Vidarbha on yellow alert for three days; Forecast of light to moderate rain with thunder, lightning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.