शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
2
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
3
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
4
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
5
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
6
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
7
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
8
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
9
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
10
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
11
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
12
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
13
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
14
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
15
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
16
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
17
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
18
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
19
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
20
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

तिजोरी रिकामी, पण बजेट जम्बो

By admin | Updated: July 1, 2014 01:51 IST

महापालिकेचा २०१४- १५ चा अर्थसंकल्प उद्या, मंगळवारी सादर होणार आहे. मनपाची तिजोरी रिकामी असली तरी बजेट मात्र जम्बो राहणार आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर यांनी

आज मनपाचा अर्थसंकल्प : निवडणूक घोषणांचा पाऊसनागपूर : महापालिकेचा २०१४- १५ चा अर्थसंकल्प उद्या, मंगळवारी सादर होणार आहे. मनपाची तिजोरी रिकामी असली तरी बजेट मात्र जम्बो राहणार आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर यांनी तब्बल १५५० कोटींचे बजेट सादर करण्याची तयारी चालविली आहे. संपलेल्या आर्थिक वर्षात महापालिकेला फक्त ८०१ कोटी रुपयांचे उत्पन्न झाले आहे. एलबीटीमुळे आर्थिक कंबर मोडली आहे. उत्पन्नवाढीचे दुसरे कोणते मोठे स्रोत नाहीत. निवडणुकीच्या तोंडावर अर्थसंकल्पात मोठमोठ्या घोषणा केल्या जातील. अशाच या सर्व घोषणांची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेकडे पैसा कुठून येईल, असा प्रश्न आहे. निवडणूक तोंडावर असल्यामुळे बोरकर यांना जनतेवर कुठलाही बोझा टाकता येणार नाही. त्यामुळे करात वाढ होण्याची शक्यता कमीच आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अध्यक्षांचे बजेट भाषणही जम्बो असेल. सुमारे ४० पानांचे भाषण असू शकते. (प्रतिनिधी)उत्पन्न असे वाढू शकते-मालमत्ता कर वसुलीपासून २५० कोटी येऊ शकतात. यासाठी कर वसुली व मूल्यांकन पद्धत बदलावी लागेल. - बंद पडलेल्या महापालिकेच्या शाळांचा व्यावसायिक उपयोग केला तर उत्पन्न वाढू शकते. -मंगळवारी शॉपिंग मॉल वगळता महापालिकतर्फे शहरात दुसरा शॉपिंग मॉल उभारण्यात आला नाही. पाच शॉपिंग मॉल प्रस्तावित आहेत. दानागंज व जरीपटकाचे काम रखडले आहे. हे देखील उत्पन्नाचे चांगले साधन आहे. -शहरातील ६ दैनिक बाजार, २३ अनधिकृत साप्ताहिक तसेच २० दैनिक बाजार अनधिकृत आहेत. नवे बाजार विकसित केले तर बाजार शुल्कापासून महापालिकेला उत्पन्न होईल. -आरेंजसिटी स्ट्रीट हा ४५० कोटींचा प्रकल्प आहे. हा प्रकल्प साकार झाला तर महापालिकेला चांगले उत्पन्न होईल. अर्थसंकल्पात काय असणार ? -बाल्या बोरकर हे पूर्व नागपुरातील आहेत. त्यामुळे अर्थसंकल्पात पूर्व नागपूर डोळ्यासमोर ठेवून काही घोषणा होऊ शकतात. सांस्कृतिक भवन, क्रीडा संकुल, हॉस्पिटलची घोषणा होऊ शकते. - पारडी उड्डाणपुलाचे काम यावर्षी सुरू होणार आहे. त्यासाठी तरतूद केली जाऊ शकते. -नागनदी, पिवळी नदी सफाई, उद्यानांचा विकास यासाठी घोषणा होईल. अंबाझरी येथे मोठा ध्वज उभारला जाईल. एस्सल वर्ल्डच्या धर्तीवर वॉटर पार्क तयरा करण्याची योजना आहे. -गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीही नागरिकांना आकर्षित करणाऱ्या घोषणा होतील. महिला व युवकांवर लक्ष केंद्रित करून एखादी नवी योजना मांडली जाऊ शकते. -बीओटी व पीपीपी तत्त्वावर काही योजना मांडल्या जाण्याची शक्यता आहे.