शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षेच्या तोंडावर युवारंग!

By admin | Updated: March 11, 2015 02:07 IST

‘युवारंग-२०१४’चा परंतु आयोजन मात्र २०१५ सालच्या मार्च महिन्यात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा अगदी तोंडावर असताना

नागपूर : ‘युवारंग-२०१४’चा परंतु आयोजन मात्र २०१५ सालच्या मार्च महिन्यात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा अगदी तोंडावर असताना या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांसाठी असलेल्या या महोत्सवाचा त्यांनाच मोकळेपणाने आनंद घेता येत नसून केवळ यंदा यात निरुत्साहच दिसून येत आहे. विद्यार्थी संघटनांच्या राजकारणामुळे ‘युवारंग’चे आकर्षण कमी होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे ठराविक महाविद्यालयांतील विद्यार्थी सहभागी झाल्याचे चित्र आहे.विद्यापीठ विद्यार्थी प्रतिनिधी परिषदेच्यावतीने दरवर्षी ‘युवा महोत्सव’ हा सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येतो. विद्यार्थ्यांमधील सुप्तगुणांना वाव देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे. विद्यापीठाशी संलग्नित असणाऱ्या सर्वच महाविद्यालयांना यात सहभाग घेता येतो. त्यामुळे या सोहळ्याला विशेष महत्त्व असते. सध्या अनेक महाविद्यालयांत विद्यापीठाच्या उन्हाळी प्रात्यक्षिक परीक्षांना सुरुवात झाली आहे, शिवाय विद्यार्थी लेखी परीक्षांच्या तयारीलादेखील लागले आहे. अशास्थितीत ९ मार्चपासून ‘युवारंग’ला सुरुवात झाली. डोळ्यासमोर परीक्षेचे दडपण असताना अनेक विद्यार्थ्यांनी ‘युवारंग’कडे पाठ फिरवली आहे. शिवाय अनेक महाविद्यालयांना तर याची सूचनाच वेळेवर देण्यात आली. त्यामुळे केवळ करायचे म्हणून केलेले आयोजन असल्याची टीका विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)कारणीभूत कोण?यंदा विद्यार्थी परिषदांच्या निवडणुका उशिरा झाल्या. त्यातच अध्यक्ष व सचिवांची निवड झाल्यानंतर पदग्रहण सोहळा साधारणत: निवडणुकांनंतर चार महिन्यांनी पदग्रहण समारंभ घेण्यात आला. निवडणुकांमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचा विजय झाला होता. परंतु पदग्रहण समारंभाबाबत आपापल्या पक्षातील नेत्यांच्या तारखा घेण्यातच वेळ गेला अन् त्याचा फटका विद्यार्थ्यांसाठी करण्यात येणाऱ्या आयोजनाला बसला. यासंदर्भात विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अशोक गोमाशे यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी ही बाब दुर्दैवी असल्याचे मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांना हक्काचा ‘प्लॅटफॉर्म’ वेळेत उपलब्ध करून द्यायला हवा होता. विद्यार्थी संघटनांनी याकडे दुर्लक्ष केले, असे ते म्हणाले.कारणीभूत कोण?यंदा विद्यार्थी परिषदांच्या निवडणुका उशिरा झाल्या. त्यातच अध्यक्ष व सचिवांची निवड झाल्यानंतर पदग्रहण सोहळा साधारणत: निवडणुकांनंतर चार महिन्यांनी पदग्रहण समारंभ घेण्यात आला. निवडणुकांमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचा विजय झाला होता. परंतु पदग्रहण समारंभाबाबत आपापल्या पक्षातील नेत्यांच्या तारखा घेण्यातच वेळ गेला अन् त्याचा फटका विद्यार्थ्यांसाठी करण्यात येणाऱ्या आयोजनाला बसला. यासंदर्भात विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अशोक गोमाशे यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी ही बाब दुर्दैवी असल्याचे मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांना हक्काचा ‘प्लॅटफॉर्म’ वेळेत उपलब्ध करून द्यायला हवा होता. विद्यार्थी संघटनांनी याकडे दुर्लक्ष केले, असे ते म्हणाले.