शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

गोरं होण्यासाठी क्रीम वापरली आणि दोन तरुणांची किडनी गेली; पाकिस्तानची 'ही' क्रिम तुमच्या जीवावर बेतू शकते !

By सुमेध वाघमार | Updated: April 18, 2026 14:17 IST

Nagpur : पाकिस्तानमध्ये तयार होणाऱ्या 'गोरी' ब्युटी क्रीमची नागपुरातील कामठी परिसरात अक्षरशः खुलेआम विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार 'लोकमत'ने स्टिंग ऑपरेशनमधून उघडकीस आणला आहे.

सुमेध वाघमारे लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाकिस्तानमध्ये तयार होणाऱ्या 'गोरी' ब्युटी क्रीमची नागपुरातील कामठी परिसरात अक्षरशः खुलेआम विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार 'लोकमत'ने स्टिंग ऑपरेशनमधून उघडकीस आणला आहे. विशेष म्हणजे, या क्रीमच्या तपासणीत तब्बल ४७ हजार पट अधिक मर्क्युरी (पारा) आढळून आला असून, त्यामुळे किडनीच्या गंभीर आजाराने ग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असतानाही तिचा बाजार मात्र तेजीत सुरू असल्याचे संतापजनक वास्तव आहे. या घातक क्रीमच्या सतत वापरामुळे लघवीतून प्रोटीन बाहेर पडण्याची समस्या निर्माण होते, ज्याला 'मेंब्रनस नेफ्रोपॅथी' हा जीवघेणा किडनी विकार म्हणतात.

नागपुरातील एका खासगी रुग्णालयात अशा २२ हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. तरीही ही क्रीम निर्धास्तपणे विकली जात असल्याने प्रशासनाच्या गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पाकिस्तानमधील 'गोरी कॉस्मेटिक्स' या कंपनीद्वारे तयार होणारी ही क्रीम त्वचा उजळवण्याच्या नावाखाली विकली जाते. मात्र, 'एम्स'च्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. मनीष श्रीगिरवार यांच्या तपासणीत या क्रिममध्ये तब्बल ४७,८९१.७पीपीएम मर्क्युरी आढळला, जो सुरक्षित मर्यादेपेक्षा हजारो पट अधिक आहे. त्यामुळे हे उत्पादन निकृष्टच नव्हे तर थेट जिवाशी खेळ करणारे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

क्रीमची बिलासह विक्री

'लोकमत' प्रतिनिधीने कामठीतील किराणा ओळीतील एका दुकानात जाऊन 'गोरी' क्रीमची मागणी केली असता, दुकानदाराने कुठलाही आढेवेढा न घेता ३३० रुपयांना क्रीम विकली. इतकेच नव्हे, तर मागणी करताच त्याने बिलही दिले. किडनी, मेंदू आणि त्वचेसाठी घातक ठरणाऱ्या या क्रीमचा असा बिनधास्त व्यापार सुरू असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

एफडीएची धडक, पण 'माल' गायब

या प्रकाराची माहिती मिळताच अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) शुक्रवारी संबंधित दुकानावर छापा टाकला. तपासणीदरम्यान दुकानदाराने 'गोरी' क्रीमचा पुरवठा मुंबईतून होत असल्याची लेखी कबुली दिली. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे, एक दिवस आधी सहज उपलब्ध असलेली क्रीम तपासणीवेळी पूर्णपणे गायब होती. यामुळे साठा मुद्दाम लपविण्यात आल्याचा संशय अधिक गडद झाला आहे. 'एफडीए'ने येत्या काही दिवसांत शहरभरातील सौंदर्य प्रसाधनांच्या दुकानांवर धडक कारवाईचे संकेत दिले आहेत. मात्र, जीवघेण्या 'गोरी' क्रीमचा काळाबाजार रोखण्यासाठी केवळ कारवाई पुरेशी ठरणार का, की या मागील संपूर्ण रॅकेट उघड होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Skin-lightening cream causes kidney failure; Pakistani product threatens lives.

Web Summary : Pakistani 'Gori' cream, openly sold in Nagpur, contains dangerously high mercury levels. It's linked to severe kidney disease, with numerous cases reported in a Nagpur hospital. Despite FDA raids, the cream persists on the market, raising concerns about public safety and regulatory oversight.
टॅग्स :Fairजत्राPakistanपाकिस्तानnagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारी