शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

खुनी हल्ल्यात दोघांना कारावास

By admin | Updated: May 13, 2016 03:21 IST

खापरखेड्याच्या चनकापूर येथील खुनी हल्ल्यात अतिरिक्त सत्र न्यायाधीश मोहम्मद सादीक मोहम्मद उमर यांच्या ...

सत्र न्यायालय : खापरखेडा चनकापूर येथील प्रकरणनागपूर : खापरखेड्याच्या चनकापूर येथील खुनी हल्ल्यात अतिरिक्त सत्र न्यायाधीश मोहम्मद सादीक मोहम्मद उमर यांच्या न्यायालयाने दोन आरोपींना तीन वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. शुभम अनिल पोटभरे (२०) आणि अजय अनिल पोटभरे (२४), अशी आरोपींची नावे असून ते चनकापूर येथील रहिवासी आहेत. जितेंद्र महेश पासवान (२१), असे जखमीचे नाव होते. खटल्याची पार्श्वभूमी अशी की, घटनेच्या दिवशी सकाळच्या वेळी जितेंद्र पासवान याचा भाऊ धर्मेंद्र आणि छोटू यांच्यासोबत आरोपींचे भांडण होऊन मारपीट झाली होती. पानठेला चालविणाऱ्या जितेंद्र याला भांडणाबाबत समजताच तो का भांडण केले, याबाबत विचारणा करण्यासाठी पोटभरे बंधूंकडे गेला होता. दोघांनीही चाकूने जितेंद्र पासवान यांच्या छातीवर, पोटावर वार करून त्यांना गंभीररीत्या जखमी केले होते. सहायक पोलीस निरीक्षक इशाक शेख यांनी या प्रकरणातील दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. तपास करून त्यांच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाने उपलब्ध साक्षीपुराव्यांवरून दोन्ही आरोपींची भादंविच्या ३०७ (खुनाचा प्रयत्न) कलमांतर्गतची शिक्षा ३२६ (गंभीर दुखापत) कलमांतर्गतच्या शिक्षेत परिवर्तित करून तीन वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. न्यायालयात सरकारच्या वतीनेअतिरिक्त सरकारी वकील प्रफुल्ल कटारिया तर आरोपींच्या वतीने अ‍ॅड. प्रदीप खांबळकर यांनी काम पाहिले. पोलीस निरीक्षक हेमंकुमार खराबे, सहायक फौजदार अरुण भुरे, अशोक शुक्ला यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले. (प्रतिनिधी)