शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

आणखी दोन संचालकांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

By admin | Updated: August 2, 2015 03:07 IST

नागपूर, अमरावती, चंद्रपूरसह अन्य शहरात टाऊनशिप उभारण्याचे आमिष दाखवून अनेकांची २ कोटी ३१ लाख ८१ हजार रुपयांनी फसवणूक ..

मॅट्रिक्स इन्फ्राइस्टेट : कोट्यवधीचे फसवणूक प्रकरणनागपूर : नागपूर, अमरावती, चंद्रपूरसह अन्य शहरात टाऊनशिप उभारण्याचे आमिष दाखवून अनेकांची २ कोटी ३१ लाख ८१ हजार रुपयांनी फसवणूक करणाऱ्या धंतोलीच्या आशा टॉवरस्थित मॅट्रिक्स इन्फ्राइस्टेटच्या आणखी दोन संचालकांचा अटकपूर्व जामीन अर्ज शुक्रवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. टी. भालेराव यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला. अमित ईश्वरी राव आणि राजेंद्र नामदेवराव भागवत, अशी या आरोपी संचालकांची नावे आहेत. यापूर्वी विजय त्रिलोकचंद वर्मा याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. या प्रकरणात डॉ. सुचितकुमार दिवाण रामटेके याच्यासह १२ आरोपी आहेत. अमरावती येथील कैलास भीमराव पाटील यांच्या तक्रारीवरून धंतोली पोलिसांनी १८ जुलै २०१५ रोजी या सर्व आरोपींविरुद्ध भादंविच्या ४२०, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपींनी धंतोली येथे आपले कार्यालय उघडल्यानंतर विविध शहरात टाऊनशिप, डेव्हलपमेंट हाऊसिंग स्किम, व्यापारी संकुल आणि इतर रहिवासी बांधकाम उभारले जात असल्याबाबतच्या जाहिराती वृत्तपत्रातून प्रसिद्ध केल्या होत्या. ठिकठिकाणी प्रॉपर्टी शो आयोजित केले होते. जाहिरातीनुसार कैलास पाटील आणि इतरांनी या कंपनीच्या वानाडोंगरी येथील १.२७ हेक्टर जागेवरील प्रस्तावित रॉयल टाऊनशिप स्कीममध्ये फ्लॅट, दुकान, रो हाऊस रोख रकमेचा भरणा करून बुक केले होते. सर्व व्यवहाराचे अ‍ॅग्रीमेंट करून १८ महिन्यात बांधकाम पूर्ण करून जागेचा ताबा देण्याचे कंपनीकडून कबूल करण्यात आले होते. प्रत्यक्षात या कंपनीने वानाडोंगरीची ही जमीन खरेदीच केली नव्हती. संबंधित जिल्हाधिकारी, नगररचना, नासुप्र आदी शासकीय कार्यालयांकडून परवानगीही घेतली नव्हती. ही बनवाबनवी लक्षात येताच लोकांनी आपले पैसे परत मागितले असता त्यांना पैसेही परत करण्यात आले नाही. त्यांची फसवणूक करण्यात आली. १२ जून २०१० ते ७ डिसेंबर २०१२ या काळात ही फसवणूक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)फसवणूक झालेल्यांची यादीमॅट्रिक्स इन्फ्रा इस्टेटच्या मोहात अडकून प्रेमदास गणवीर यांची ८ लाख ८३ हजार, सुचित्रा लोहकरे यांची २ लाख ६१ हजार, धर्मेंद्र यादव यांची ३ लाख ५ हजार, अनुर्ध्वज रंगारी यांची २ लाख ९८ हजार, हेमंत करमरकर यांची १ लाख ५३ हजार, सुनील खोब्रागडे यांची ८६ हजार, नलिनी कुळकर्णी यांची २ लाख ८० हजार, अमित रेवतकर यांची ५ लाख ५८ हजार, सविता गोन्नाडे यांची ३ लाख ३६ हजार, जयश्री चोले यांची ३ लाख ७७ हजार, संजय रामटेके यांची ६५ हजार, संजय सोमकुवर यांची ८० हजार, नंदकिशोर साबळे यांची २ लाख ९० हजार, सुरेश ब्राह्मणकर यांची २ लाख ९५ हजार, राजेश चेटुले यांची १ लाख ७८ हजार, शेवंताबाई रावते यांची ३ लाख १२ हजार, नरेंद्र चोले यांची २ लाख ३० हजार, विलास कापगते यांची १ लाख ८३ हजार, प्रफुल्ल कानांनी यांची १६ लाख ८० हजार आणि भीमराव खोब्रागडे यांची २ लाख ८० हजाराने फसवणूक झालेली आहे. फसवणूक झालेल्यांमध्ये मध्यमवर्गीय, नोकरदार आणि सेवानिवृत्तांची मोठी संख्या आहे. स्वत:च्या घराचे स्वप्न पाहून त्यांनी या कंपनीकडे आपल्या मेहनतीच्या पैशाचा भरणा केला होता. या कंपनीने अनेकांना चेकने पैसे परत केले. परंतु कंपनीच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने त्यांचे चेक परत आले. न्यायालयात सरकार पक्षाच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील प्रशांत भांडेकर, प्रशांत साखरे, लीलाधर शेंद्रे यांनी काम पाहिले. सहायक पोलीस उपनिरीक्षक के. एन. गड्डिमे हे या प्रकरणाचे तपास अधिकारी आहेत.