नागपुरात सव्वा सव्वा वर्षांसाठी दोन महापौर; संदीप जोशी आणि दयाशंकर तिवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 12:43 PM2019-11-18T12:43:39+5:302019-11-18T12:47:12+5:30

भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत नागपूरसाठी दोन महापौरांची निवड करण्यात आली. महापौरपद हे सव्वा सव्वा वर्षांसाठी राहणार असून त्यातल्या पहिल्या टर्ममध्ये संदीप जोशी हे महापौरपदाचा कार्यभार सांभाळतील तर दुसऱ्या टर्ममध्ये दयाशंकर तिवारी हे सूत्रे सांभाळतील.

Two mayors in Nagpur for one years; Sandeep Joshi and Dayashankar Tiwari | नागपुरात सव्वा सव्वा वर्षांसाठी दोन महापौर; संदीप जोशी आणि दयाशंकर तिवारी

नागपुरात सव्वा सव्वा वर्षांसाठी दोन महापौर; संदीप जोशी आणि दयाशंकर तिवारी

googlenewsNext
ठळक मुद्देउपमहापौरपदी मनिषा कोठे आणि संदीप जाधव

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर:  भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत शनिवारी यावर चर्चा करण्यात आली होती. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पार्लमेंट्री बोर्डाच्या सदस्यांसोबत चर्चा करून महापौरपदाचे नाव निश्चित करणार होते. त्यानुसार नागपूरसाठी दोन महापौरांची निवड करण्यात आली. महापौरपद हे सव्वा सव्वा वर्षांसाठी राहणार असून त्यातल्या पहिल्या टर्ममध्ये संदीप जोशी हे महापौरपदाचा कार्यभार सांभाळतील तर दुसऱ्या टर्ममध्ये दयाशंकर तिवारी हे सूत्रे सांभाळतील. उपमहापौरपदी मनिषा कोठे तर सत्तापक्ष नेते म्हणून संदीप जाधव कार्यभार सांभाळतील असे जाहीर करण्यात आले आहे. नागपूरच महापौरपदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ शिल्लक असून त्यासाठी ही तरतूद करण्यात आली आहे. 

Web Title: Two mayors in Nagpur for one years; Sandeep Joshi and Dayashankar Tiwari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.