शहरं
Join us  
Trending Stories
1
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
2
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
3
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
4
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
5
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
6
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
7
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
8
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
9
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
10
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
11
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
12
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
13
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
14
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
15
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
16
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
17
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
18
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
19
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
20
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
Daily Top 2Weekly Top 5

क्षय रोगाचा वॉर्ड बंद

By admin | Updated: June 14, 2014 03:05 IST

क्षयरोगाचा वॉर्ड तब्बल महिन्याभरापासून डागडुजीच्या नावाखाली बंद आहे.

सुमेध वाघमारे नागपूर
क्षयरोगाचा वॉर्ड तब्बल महिन्याभरापासून डागडुजीच्या नावाखाली बंद आहे. विभागातील डॉक्टर गंभीर रुग्णांना मेयोकडे रेफर करीत आहे. मात्र, आता तेथीलही खाटा फुल्ल

झाल्याने रुग्ण वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे. आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे रुग्णालय असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल)

छाती व क्षयरोग विभागाची ही दयनीय स्थिती आहे.
मेडिकल रुग्णालयापासून थोड्या अंतरावर छाती व क्षयरोग विभाग आहे. या विभागाकडे तसेही मेडिकल प्रशासनाचे विशेष लक्ष नाही. वाळीत टाकल्याप्रमाणेच या

विभागाची स्थिती आहे. या विभागाला ४२ व ४३ असे दोन वॉर्ड देण्यात आले होते. पूर्वी ४३ क्रमांकाचा वॉर्ड महिलांसाठी तर ४२ क्रमांकाचा वॉर्ड पुरुषांसाठी होता. या

दोन्ही वॉर्डात छाती व क्षय रोगाचे रुग्ण एकत्र ठेवले जायचे. क्षयरोग हा संसर्गजन्य आजार आहे. यामुळे छाती रोगाच्या रुग्णाला याचा धोका होण्याची शक्यता अधिक

असायची. विभाग प्रमुख डॉ. घोरपडे यांनी या विभागाचा पदभार सांभाळताच याची दखल घेतली. छातीरोगाच्या रुग्णासाठी स्वतंत्र वॉर्ड करण्यासाठी त्यांनी मेडिकल

प्रशासनाकडे तगादा लावला. अखेर सुपर स्पेशालिटी रुग्णालयात छाती रोगाचा वॉर्ड मिळाला. जुन्या वॉर्डातील मनुष्यबळ या नव्या वॉर्डात गेले. यामुळे क्षय रोगाचे दोन वॉर्ड

सांभाळण्यासाठी मनुष्यबळ अपुरे पडले. अखेर महिला आणि पुरुषांना एकाच वॉर्ड क्र. ४२ मध्ये ठेवण्यात येऊ लागले. तात्पुरती सोय म्हणून पडदे टाकून वॉर्डाचे दोन भाग

केले. मात्र, महिलेच्या तुलनेत पुरुषांची संख्या जास्त असल्याने पडदा नावासाठीच राहिला. पुरुष आणि महिला यांची स्वतंत्र व्यवस्था करण्यासाठी डॉ. घोरपडे यांचे प्रयत्न

सुरू आहेत, परंतु मनुष्यबळ नसल्याचे कारण सांगून वेळ मारून नेली जात आहे. वॉर्ड क्र. ४२ ची स्थिती दयनीय आहे. अनेक वर्षांपासून रंगरंगोटी झालेली नव्हती. वॉर्डात

एकच प्रसाधन गृह असल्याने पुरुष आणि महिला रुग्णांना याचा वापर करताना अडचणीचे जात होते. जागोजागी टाईल्सही उखडल्या होत्या. या संदर्भाचीही माहिती विभाग

प्रमुखांनी अधिष्ठात्यांना दिली होती.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार महिन्याभरापूर्वी अचानक या वॉर्डातील डागडुजीचे काम विभाग मेडिकलच्या बांधकाम विभागाने सुरू केले. वऱ्हांड्यातील जुन्या टाईल्स

काढणे सुरू झाले. आधीच क्षयरोगाचे रुग्ण यात धुळीचा त्रास. यामुळे रुग्णांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता होती. यातच वॉर्डातही काही काम करण्यात येणार होते.

परिणामी डॉ. घोरपडे यांनी अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांना याची माहिती दिली. डॉ. पोवार यांनी येथील वॉर्डाचे काम पूर्ण होईस्तोवर रुग्णांना मेयो रुग्णालयात भरती

करण्यास सांगितले. याला रुग्णांच्या नातेवाईकांनी विरोध केला. परंतु डॉक्टरांनी समजावून सांगितल्यानंतर रुग्ण मेयो रुग्णालयात दाखल झाले. सध्याच्या स्थितीत मेडिकलचा

क्षयरोग विभाग आठवड्यातून दोन-चार रुग्ण मेयोमध्ये पाठवित आहे. परंतु मेयो रुग्णालयाचे स्वत:चे रुग्ण आणि यात मेडिकलचेही रुग्ण वाढल्याने क्षय रुग्णाचा वॉर्ड फुल्ल

झाला. रुग्णाला पाठवू नका, अशी सूचनाही केली आहे. इकडे बांधकाम विभाग महिना होऊनही संथगतीने काम करीत होता. यातच मागील दोन आठवड्यापासून कामही

बंद पडले. या संदर्भात डॉ. घोरपडे यांनी बांधकाम विभागाच्या संबंधित कंत्राटदाराला विचारले असता, निधी नसल्याचे सांगून काम पूर्ण होण्यास वर्षेही लागतील अशी

उडवाउडवीची उत्तरे दिली. वॉर्ड नसल्याने क्षय रोगाचे रुग्ण अडचणीत आले आहेत. या रुग्णांना कुठे भरती करावे असा प्रश्न डॉक्टरांसमोर आहे. अशावेळी रुग्णाला काही

झाल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.