शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे झोन कार्यालयासाठी प्रयत्न करणार

By admin | Updated: November 8, 2015 03:11 IST

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे झोन बिलासपूरला आहे. त्यामुळे मध्य प्रदेशातील रेल्वे प्रकल्पांची कामे मार्गी लागतात.

नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे झोन बिलासपूरला आहे. त्यामुळे मध्य प्रदेशातील रेल्वे प्रकल्पांची कामे मार्गी लागतात. परंतु महाराष्ट्रातील प्रकल्प अपूर्ण राहतात. त्यासाठी विदर्भातील सर्व खासदारांनी एकत्र येऊन नागपुरात झोन कार्यालय सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या अंतर्गत येणाऱ्या खासदारांनी पत्रकारांशी बोलताना दिली.दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सत्येंद्र कुमार यांच्यासोबत दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत येणाऱ्या खासदारांनी संवाद साधला. अध्यक्षस्थानी खासदार फग्गन सिंह कुलस्ते होते. बैठकीला राज्यसभेचे खासदार अजय संचेती, बालाघाटचे खासदार बोधसिंग भगत, राजनांदगावचे खासदार अभिषेक सिंह, रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, भंडारा-गोंदियाचे खासदार नाना पटोले,उपस्थित होते. यावेळी बोलताना खासदार कृपाल तुमाने यांनी नागपूर-रामटेक पॅसेंजरचा बुटीबोरीपर्यंत विस्तार करण्याची मागणी करून, गोंडवाना, विदर्भ एक्स्प्रेसला कामठीत थांबा देण्याची तसेच नागपूरला झोन तयार करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती दिली. खासदार फग्गन सिंह कुलस्ते यांनी रेल्वेत सुरक्षा अणि सफाईकडे विशेष लक्ष पुरविण्याची मागणी केली. बैठकीला उपस्थित खासदारांनी विविध मागण्या रेटून धरल्या. यात बालाघाट-कटंगी दरम्यान सकाळी नवी गाडी सुरु करणे, कटंगी-तिरोडा रेल्वे लाईनची निर्मिती, गोंदिया-चांदाफोर्ट भागात सर्व प्लॅटफार्मची उंची वाढविणे, दुरांतो एक्स्प्रेसला गोंदियात थांबा देणे, गोंदिया मालधक्क्याला गोंदिया शहराबाहेर स्थानांतरित करणे, बिलासपूर-नागपूर इंटरसिटीमध्ये रायपूरच्या वेळेत बदल करणे, नागपूर-नागभीड ब्रॉडगेज, वडसा-गडचिरोली दरम्यान नवी लाईन या विषयांवर चर्चा करण्यात आली. सर्व प्रथम दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सत्येंद्र कुमार यांनी उपस्थित खासदारांचे स्वागत करून दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या बिलासपूर झोनमध्ये येणाऱ्या खासदारांची समिती गठित करण्याची सूचना केली. त्यांच्या हस्ते उपस्थित खासदारांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. बैठकीला विभागीय रेल्वे व्यवस्थापक आलोक कंसल आणि अधिकारी उपस्थित होते.