शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

महाकवी कालिदासाचे पदस्पर्श शोधणारे ‘ट्रेकिंग’

By admin | Updated: July 3, 2014 00:59 IST

महाकवी कालिदासाने त्याची अजरामर रचना ‘मेघदूतम’ रामटेक परिसरात रचली. निश्चितच कालिदास रामटेक परिसरात फिरला असणार. कालिदासाला अभिवादन करताना त्याच्या साहित्यकृतींचा

महाकवी कालिदासाला अनोखी आदरांजली : सीएसी आॅलराऊंडरचा पुढाकारनागपूर : महाकवी कालिदासाने त्याची अजरामर रचना ‘मेघदूतम’ रामटेक परिसरात रचली. निश्चितच कालिदास रामटेक परिसरात फिरला असणार. कालिदासाला अभिवादन करताना त्याच्या साहित्यकृतींचा अभ्यास आणि चर्चा केली जाते. त्याच्या भाषिक सौंदर्यावर संवाद होतो. पण निसर्गावर प्रेम करणाऱ्या साहसवीरांनी कालिदासाला अनोखी आदरांजली वाहिली. कालिदासाने मेघदूतममध्ये जे वर्णन केले आहे; त्यावेळी कशी स्थिती असेल, कालिदास कुठे गेला असेल, कसा फिरला असेल याची कल्पना करीत आषाढाचा पहिला दिवस कालिदासाची आठवण करीत त्याचा मार्ग धुंडाळत साहसवीरांनी ट्रेकिंगच्या माध्यमात घालविला. कालिदासावर प्रेम करणाऱ्या या साहसवीरांनी दोन दिवस रामटेक परिसरात कड्याकपाऱ्यावरुन ट्रेकिंग केली. यात बच्चेकंपनीसह युवा आणि मध्यमवयीन ट्रेकरही सहभागी झाले होते. रामटेकजवळील सिंधुरागिरी पर्वतावर असलेल्या त्रिविक्रम मंदिराच्या परिसरात कालिदासांनी मेघदूतची रचना केली. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात आलेल्या स्मारकाच्या भिंतीवर ही रचना आहे. कालिदास आणि विदभार्ची नाळ या मेघदूतानेच जोडली. त्यातूनच काही वर्षांपूर्वी कालिदासांच्या स्मृतिप्रीत्यर्थ्य कालिदास महोत्सव सुरू करण्यात आला. आषाढाचा पहिला दिवस मात्र कालिदासाचे स्मरण करून देणारा आहे. कालिदासाला अभिवादन करताना सीएसी आॅलराऊंडर या साहसी संस्थेने थेट कालिदासाच्या पदचिन्हांचीच शोधमोहीम हाती घेतली. कालिदासाचे स्मरण एका दिवसापुरते मर्यादित न राहता कालिदासांच्या स्मृती कायम जिवंत राहाव्यात म्हणून त्यांनी वर्षभर विविध कार्यक्रमांची आखणी केली आहे. आमदार आशिष जयस्वाल यांनीही त्यासाठी पुढाकार घेतला आहे. या कार्यक्रमाची सुरुवात त्यांनी ट्रेकिंगने केली. सीएसीच्या साईटवरून ट्रेकिंगला सुरुवात झाली. त्रिविक्रम मंदिर, कालिदास स्मारक, गडमंदिर, कर्पूरबावडी, सिंधुरागिरी पर्वत अशा ज्या ज्या परिसरात कालिदासांनी वास्तव्य केले, तो संपूर्ण परिसर साहित्य, कला, संस्कृती व निसर्गाबद्दल प्रेम असणाऱ्या रसिकांनी ट्रेकिंग करीत पिंजून काढला. सिंधुरागिरी पर्वतावरून दिसणारा अंबाळा तलाव, खिंडसी आणि या परिसरातील निसर्गदर्शन त्यांनी घेतले. सिंधुरागिरी पर्वतावरून दुसऱ्या दिवशी ट्रेकिंगला सुरुवात झाली. ट्रेकिंगमध्ये सहभागी रसिकांनी हा संपूर्ण पर्वत पिंजून काढून खिंडसी बॅकवॉटरने सीएसी साईटवर परत आले. काहींनी कालिदास स्मारकांच्या भिंतीवरील मेघदूताचे वाचन केले. रसिकांच्या ट्रेकिंगच्या उत्साहाला वातावरणानेसुद्धा साथ दिली.(प्रतिनिधी)