शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

कमी प्लेटलेट्सवर औषधोपचार शक्य : रिया बल्लीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 19:53 IST

डेंग्यू रोगामध्ये रक्तातील प्लेटलेट्सची संख्या कमी होऊ लागते. मात्र, आता औषधोपचाराने प्लेटलेट्सची संख्या वाढविता येणे शक्य झाले आहे. त्यामुळे रक्तातील प्लेटलेट्सची संख्या घटली तरी डेंग्यू रुग्णांनी घाबरण्याचे कारण नाही, असा सल्ला डॉ. रिया बल्लीकर यांनी दिला.

ठळक मुद्देऑन्कोलॉजी-हेमॅटोलॉजी विषयावर परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डेंग्यू रोगामध्ये रक्तातील प्लेटलेट्सची संख्या कमी होऊ लागते. मात्र, आता औषधोपचाराने प्लेटलेट्सची संख्या वाढविता येणे शक्य झाले आहे. त्यामुळे रक्तातील प्लेटलेट्सची संख्या घटली तरी डेंग्यू रुग्णांनी घाबरण्याचे कारण नाही, असा सल्ला डॉ. रिया बल्लीकर यांनी दिला. अकादमी ऑफ मेडिकल सायंसेसच्या नागपूर शाखेतर्फे ‘हेमॅटो-ऑन्को सिम्पोसियम’चे आयोजन रविवारी करण्यात आले होते. यावेळी ‘आयटीपी-व्हॉट्स न्यू’ या विषयावर त्या बोलत होत्या.पुढे त्या म्हणाल्या की, प्लेटलेटस्ची रक्तातील संख्या घट होण्यासाठी डेंग्यू-मलेरियासारखे आजार, रक्ताचा कर्करोग, आयटीपी, अप्लास्टिक अ‍ॅनेमिया आदी रोग कारणीभूत आहेत. अनेकदा रुग्णांना प्लेटलेट्स चढविण्याची गरज असते. प्लेटलेट्सअभावी रुग्णाच्या जीवाला धोका संभवतो. त्यामुळे नागरिकांनी प्लेटलेट्स डोनेशन करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.डॉ. विनय बोहरा यांनी ‘लिम्फोमा’ या आजारावरील उपचाराबद्दल बोलताना त्यांनी यासाठी ‘इम्युनोथेरपी’ प्रभावी असल्याचे सांगितले. यातील औषधे केवळ कॅन्सरच्या पेशीला नष्ट करतात. अन्य पेशींना त्यामुळे इजा पोहचत नसल्याने औषधांचा प्रभाव चांगला होत असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. डॉ. गिरीश बदरखे यांनी ‘एचएलएच’ या लहान मुलांमध्ये आढळून येणाऱ्या रक्तसंसर्गित दुर्धर आजाराची माहिती दिली. या रोगावर उपचार करण्यासाठी किमोथेरपी प्रभावी ठरत असली तरी बोन मॅरो ट्रान्सप्लांटने या रोगाला रोखण्यात यश मिळू शकते अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.या परिषदेमध्ये रक्ताचे विविध विकार, रक्त कर्करोग, प्लेटलेटस आणि अन्य रक्त घटकांचा अभ्यास आणि नवीन औषधोपचार पद्धती या विषयांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये डॉ. दीपंजन हलदार, डॉ. फराह जिजिना, डॉ. रिया बल्लीकर, डॉ. समीर मेलिनकेरी, डॉ. विनय बोहरा, डॉ. गिरीश बदर्खे, डॉ. अविनाश पोफळी, डॉ. गोहोकर, डॉ. ए.के. गंजू यांनीही मार्गदर्शनपर सत्र आयोजित केली होती.प्रास्ताविक अकादमी ऑफ मेडिकल सायंसेसचे अध्यक्ष डॉ. निर्मल जयस्वाल यांनी केले. आभार डॉ. संजय जैन यांनी व्यक्त केले. डॉ. रिया बल्लीकर या सिम्फोसियमच्या समन्वयिका होत्या.

टॅग्स :dengueडेंग्यूdoctorडॉक्टर