वनविभागातील ६९ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 07:05 AM2020-08-11T07:05:09+5:302020-08-11T07:07:42+5:30

राज्याच्या महसूल व वनविभागाने सोमवारी भारतीय वन सेवेतील ५३ अधिकाऱ्यांच्या पदोन्नती आणि बदलीची पहिली जादी जाहीर केली आहे.

Transfers of 69 senior officers in the forest department | वनविभागातील ६९ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

वनविभागातील ६९ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

googlenewsNext
ठळक मुद्देगोरेवाडाला पंचभाई येणारअनेकांना पदोन्नती

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्याच्या महसूल व वनविभागाने सोमवारी भारतीय वन सेवेतील ५३ अधिकाऱ्यांच्या पदोन्नती आणि बदलीची पहिली जादी जाहीर केली. या सोबतच सहायक वनसंरक्षक संवर्गातील १० अधिकाऱ्यांच्या बदल्यांची दुसरी आणि विभागीय वन अधिकारी गट अ (वरिष्ठ श्रेणी) पदावरील ६ अधिकाऱ्यांच्या बदलीची तिसरी यादी जाहीर केली. अशा एकूण ६९ अधिकाऱ्यांच्या बदल्या करून वनविभागाने फेरबदलाचे संकेत दिले आहेत.
पहिल्या यादीमध्ये ५३ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यात बहुतेक अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने बदल्या झाल्या आहेत. यात अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक पदावरील एक अधिकारी, मुख्य वनसंरक्षक पदावरील ८, वनसंरक्षक पदावरील १५ आणि उपवनसंरक्षक पदावरील २९ अधिकाºयांचा समावेश आहे.

पुणे येथील मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर यांना अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक पदी बढती मिळाली असून मुख्यालय पुणे येथे त्यांची पदस्थापना करण्यात आली आहे. चंद्रपूर वन अकादमीचे संचालक अ.ना. खडसे यांना मुख्य महाव्यवस्थापक (औषधी वनस्पती, एफडीसीएम) नागपूर येथे मुख्य वनसंरक्षक श्रेणीत पदोन्नती मिळाली आहे.
चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक श्री.एस. रामराव यांची त्याच पदावर यवतमाळ येथे प्रशासकीय बदली करण्यात आली आहे. त्यांच्या रिक्त पदावर ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक व क्षेत्र संचालक एन. आर. प्रवीण यांना पदोन्नती मिळाली आहे. प्रवीण यांच्या रिक्त होणाऱ्या पदावर ठाणे येथील उपवनसंक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांना पदोन्नती मिळाली आहे.

धुळे येथील मुख्य वनसंरक्षक ए.एस. कळसकर यांना विनंतीवरून सदस्य सचिव, म.रा. प्राणिसंग्रहालय प्राधिकरण, नागपूर येथे देण्यात आले आहे. यवतमाळचे वनसंक्षक आर. के. वानखेडे यांची मुख्य वनसंरक्षक, शिक्षण व प्रशिक्षण पदावर पुणे येथे पदोन्नतीने बदली झाली आहे.
गोंदियाचे उपवनसंरक्षक श्री. एस. युवराज यांची गिन्नी सिंह यांच्या बदलीने रिक्त होणाऱ्या संरक्षक, नियोजन व व्यवस्थापन, वन्यजीव, नागपूर या पदावर पदोन्नती करण्यात आली आहे. तर गिन्नी सिंह यांची मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नागपूर या पदी प्रशासकीय कारणावरून बदली करण्यात आली आहे.

उपवनसंरक्षक (संसाधन उपयोग) नागपूरचे डॉ. किशोर मानकर यांना वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण, नागपूर येथे तर, एन.एस. लडफत, गाभा क्षेत्र ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक यांना वनसंरक्षक, (कार्य आयोजना) पुणे पश्चिम येथे पदोन्नती मिळाली आहे. बुलडाण्याचे उपवनसंरक्षक एस. एन. माळी पदोन्नतीने कार्य आयोजना, पूर्व नागपूर येथे येत आहेत. बल्लारपूरचे उपवनसंरक्षक व्ही. एन. हिंगे यांची तिथेच वनसंरक्षक (वाहतूक व विपणन) पदी पदस्थापना झाली आहे.
पुणे येथील उपवनसंरक्षक ए. श्रीलक्ष्मी यांची प्रशासकीय कारणावरून नागपूर येथे त्याच पदावर (मानव संसाधन, व्यवस्थापन) बदली झाली आहे. अमरावतीचे उपवनसंरक्षक गजेंद्र नरवणे आता मंत्रालय महसूल व वनविभाग येथे जात आहेत. बांबू व संशोधन प्रशिक्षण केंद्र चिचपल्लीचे संचालक राहुल पाटील पुणे येथे उपवनसंरक्षक पदावर जात आहेत. त्यांच्या रिक्त पदावर पांढरकवड्याच्या उपवन संरक्षक के.एम. अभर्णा येत आहेत.

मध्य चांदा उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे यांची ठाणे येथे तर यवतमाळचे उपवनसंरक्षक भानुदास पिंगळे यांची ठाणे मुख्य वनसंक्षक (वन्यजीव) येथे प्रशासकीय कारणावरून बदली करण्यात आली आहे. पिंगळे यांच्या जागेवर हिंगोलीचे विभागीय वन अधिकारी केशव वाबळे येत आहेत. तर हिरे यांच्या जागेवर पुुसदचे उपवनसंरक्षक अरविंद मुंढे येत आहेत. भंडाऱ्याचे उपवनसंरक्षक विवेक होशिंग विनंती अर्जावरून जळगावला जात आहेत.
मेळघाटचे उपवनसंरक्षक अविनाश कुमार उपवनसंरक्षक सिपना येथे उपवनसंरक्षक (वन्यजीव) पदावर जात आहे. चंद्रपूरचे विभागीय वन अधिकारी ए. एल. सोनकुसरे पुसदला उपवनसंरक्षक पदावर जात आहेत.

गोरेवाडाचे विभागीय वन अधिकारी नंदकिशोर काळे हे गाभा क्षेत्र, ताडोबा-अंधारी येथे जात आहेत. तर, (प्रशिक्षणावर असलेले) विभागीय वन अधिकारी पी.बी. पंचभाई हे आता गोरेवाडा विभागीय व्यवस्थापक म्हणून येत आहेत. विभागीय वन अधिकारी, राज्य प्राणिसंग्रहालय नागपूर येथील विभागीय वन अधिकारी के. डब्ल्यू धामगे हे यवतमाळला उपवनसंक्षक म्हणून जात आहेत.

 

Web Title: Transfers of 69 senior officers in the forest department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.