शहरं
Join us  
Trending Stories
1
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
2
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
3
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
4
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
5
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
6
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
7
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
8
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
9
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
10
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
11
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
12
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
13
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
14
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
15
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
16
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
17
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
18
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
19
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
20
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेगाड्या ‘फुल्ल’

By admin | Updated: April 28, 2016 02:54 IST

उन्हाचा पारा वाढलेला असताना रेल्वेगाड्यात पाय ठेवायलाही जागा नसल्याची स्थिती आहे. उन्हाळ्याच्या सुट्यात रेल्वेगाड्यात प्रवाशांची गर्दी वाढली आहे.

प्रवाशांची गैरसोय : मे महिन्यात गंभीर स्थितीनागपूर : उन्हाचा पारा वाढलेला असताना रेल्वेगाड्यात पाय ठेवायलाही जागा नसल्याची स्थिती आहे. उन्हाळ्याच्या सुट्यात रेल्वेगाड्यात प्रवाशांची गर्दी वाढली आहे. यामुळे आरक्षणाचे तिकीट मिळणे दुरापास्त झाले असून, रेल्वे प्रशासनाने सुरू केलेल्या विशेष रेल्वेगाड्यात तात्काळचे तिकीटही मिळत नसल्याची स्थिती आहे. मे महिन्यात ही स्थिती आणखीनच बिकट होणार असल्याची शंका वर्तविण्यात येत आहे. रेल्वेगाड्यात आरक्षणाचे तिकीट मिळत नसल्यामुळे अनेक प्रवाशांना आपला प्रवास रद्द करण्याची पाळी येत आहे. नागपूर रेल्वे स्थानकावरून दिवसाकाठी १५० रेल्वेगाड्या आणि ५० ते ६० हजार प्रवासी ये-जा करतात. प्रवाशांना आरक्षणाचे तिकीट तर मिळत आहे, परंतु भलीमोठी प्रतीक्षायादी असल्यामुळे त्यांच्या प्रवासात अडथळा येत आहे. नागपुरातून दिल्ली, मुंबई, हावडा, चेन्नई, पाटणा, जयपूर, लखनौ, बंगळुरू, इंदोर आदी शहरात जाणाऱ्या गाड्यात हीच स्थिती आहे. काही एसी रेल्वेगाड्यात तर ‘रिग्रेट’ची स्थिती आहे. या गाड्या हाऊसफुल्ल झाल्यामुळे या गाड्यांची तिकीट विक्री बंद करण्यात आली आहे. रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत रेल्वेगाड्यातील गर्दी कायम राहणार आहे. परंतु रेल्वे प्रशासन काही विशेष रेल्वेगाड्या चालवीत आहे. यात प्रवाशांना काही टक्के दिलासा मिळू शकतो. प्रवासी तात्काळचे तिकीट खरेदी करून आपला प्रवास सुखाचा करू शकतात. दरवर्षी उन्हाळ्यात आणि दिवाळीत हीच स्थिती निर्माण होत असल्यामुळे, रेल्वे प्रशासनाने यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी प्रवासी करीत आहेत. (प्रतिनिधी)दलालांचा फायदाप्रवाशांना आरक्षणाचे कन्फर्म तिकीट मिळेनासे झाले असताना, दलाल याचा फायदा घेऊन प्रवाशांना मोठी रक्कम घेऊन तिकीट उपलब्ध करून देत आहेत. आयआरसीटीसीचे अकाऊंट तयार करून नागपुरातील काही दलाल प्रवाशांना अधिक रक्कम घेऊन तिकीट देत आहेत. रेल्वे सुरक्षा दल अशा दलालांवर नजर रोखून आहे. दलाल आणि वाणिज्य विभागाचे कर्मचारीही सतर्कता विभाग आणि सीबीआयच्या नजरेखाली आहेत. रेल्वे सुरक्षा दलाने नुकतेच टेकडी गणेश मंदिर येथील उड्डाणपुलाखालील एका ट्रॅव्हल्स प्रतिष्ठानच्या दलालास रंगेहाथ पकडले होते.