शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

दुर्मिळ पक्ष्यांची तस्करी पकडली

By admin | Updated: August 21, 2016 03:14 IST

वन तस्कारांनी ‘जय’चे तस्कारी केल्याचा आरोप होत असतानाच शनिवारी नागपूर रेल्वेस्थानकावर रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ)

आरोपी फरार : आरपीएफची कारवाईनागपूर : वन तस्कारांनी ‘जय’चे तस्कारी केल्याचा आरोप होत असतानाच शनिवारी नागपूर रेल्वेस्थानकावर रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) दुर्मिळ प्रजातीच्या आठ पक्ष्यांची तस्करी उघडकीस आणली. या तस्करीतील आरोपी फरार झाले असून ही घटना नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक २ वर घडली. नंतर जप्त करण्यात आलेले पक्षी वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांना दानापूर-सिकंदराबाद एक्स्प्रेसमधून दुर्मिळ प्रजातीच्या पक्ष्यांची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार कमांडंट ज्योती कुमार सतीजा यांच्या मार्गदर्शनाखाली आरपीएफचे निरीक्षक वीरेंद्र वानखेडे, उपनिरीक्षक कृष्णा नंद राय, आरपीएफचा जवान विकास शर्मा, विनोद राठोड, बिक्रम यादव, किशोर चौधरी यांनी रेल्वेगाडी क्रमांक १२७९२ दानापूर-सिकंदराबाद एक्स्प्रेसची तपासणी केली. यावेळी एस १२ कोचमध्ये बर्थ क्रमांक ७, ८ च्या खाली दोन प्लॉस्टिकच्या बॅगमध्ये हे आठ पक्षी आढळले. आजूबाजूच्या प्रवाशांना विचारणा केली असता कुणीच हक्क सांगितला नाही. तस्करीसाठी नेण्यात येत असलेल्या पक्ष्यात पाच मोठे आणि तीन दुर्मिळ प्रजातीच्या पक्ष्यांचा समावेश आहे. आरपीएफच्यावतीने याबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आली. वन विभागाचे अधिकारी रमेश आदमने, वनपाल ललित गेडाम, अनिल खडोदकर, मंगेश इनवाते यांनी आरपीएफ ठाण्यात येऊन या पक्ष्यांना ताब्यात घेतले. रेल्वे सुरक्षा दलाने याबाबत इंटरनेटवर शोध घेतला असता यातील तीन पक्षांची ओळख पटविण्यात यश आले. यातील दोन पक्षी प्लम हेडेड पॅरेट असून याची किंमत १० हजार रुपये जोडी आहे तर एक पक्षी बोलणारी कॉमनहिल मैना असून आंतरराष्ट्रीय बाजारात तिची किंमत १५०० डॉलर म्हणजे १ लाख रुपये आहे. इतर पाच पक्ष्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. (प्रतिनिधी)