गडकरी घेणार आज मिहानचा आढावा

By Admin | Updated: June 14, 2014 03:02 IST2014-06-14T03:02:16+5:302014-06-14T03:02:16+5:30

केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी शनिवारी मिहान प्रकल्पाचा आढावा घेणार आहेत.

Today's review of Mihan will take place in Gadkari | गडकरी घेणार आज मिहानचा आढावा

गडकरी घेणार आज मिहानचा आढावा

नागपूर : केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी शनिवारी मिहान प्रकल्पाचा आढावा घेणार आहेत. रविभवनमध्ये सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या या बैठकीस महाराष्ट्र

विमानतळ विकास कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांसह विभागीय आयुक्त अनुपकुमार व नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती डॉ. प्रवीण दराडे व जिल्हाधिकारी अभिषेक

कृष्णा उपस्थित राहणार आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या काळात मिहान प्रकल्पातील विजेचा प्रश्न गाजला होता. भूसंपादन आणि पुनर्वसनाच्या कामातही अनेक अडचणी आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या

मोबदल्याबाबत प्रश्न निकाली निघाला नाही. ‘टॅक्सी वे’ चे कामही गावकऱ्यांनी बंद पाडले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात गडकरी यांनी मिहान प्रकल्पाला गती देण्याचे आश्वासन दिले होते. केंद्रात मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शनिवारी प्रथमच ते विविध

विभागाच्या कामांचा आढावा घेणार आहेत. त्यात मिहान प्रकल्पांचाही समावेश आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Today's review of Mihan will take place in Gadkari