शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET पेपरफुटी प्रकरणात CBI ची मोठी कारवाई; मुख्य सूत्रधाराला अटक, पेपर कसा फुटला?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा कोणत्याही कराराविना चीन दौरा संपला; इराण युद्धावर तोडगा निघालाच नाही
3
रुपया ९६ पार, इतिहासात पहिल्यांदा डॉलरच्या तुलनेत इतकी कमकुवत झाली भारतीय करन्सी; सामान्यांवर काय परिणाम होणार?
4
अमित शाह यांना धमकी देणं भोवलं, अभिषेक बॅनर्जी यांच्यावर बंगालमध्ये गुन्हा दाखल; कारवाई होणार
5
उकाड्यातून लवकरच सुटका होणार! मान्सून वेळेआधीच येणार, २६ मे रोजीच केरळात ठेवणार पाऊल
6
इस्रायल-लेबनॉन शस्त्रसंधी ४५ दिवसांसाठी वाढवली; गाझामध्ये हमासचा लष्करप्रमुख ठार
7
आजचे राशीभविष्य - १६ मे २०२६, मोठा आर्थिक लाभ होणार; नवीन कामे पूर्ण होणार
8
अग्रलेख: महागाईच्या आगीत तेल! सर्वसामान्यांच्या खिशावरच टाच 
9
मुलाखत: ‘कार्व्हर’, अजूनही लोकांना काही ना काही देतोच!
10
मुंबईची कायदा-सुव्यस्था मनोजकुमार शर्मा यांच्याकडे, सत्यनारायण यांच्याकडे वाहतूक, कुंभारेंकडे गुन्हे 
11
अमेरिकेत अदानींना मोठा दिलासा; अदानी कुटुंब १८ दशलक्ष डॉलरचा दंड भरणार
12
निवडणुका संपताच १६ दिवसांतच भाववाढ; पेट्रोल-डिझेल ३ रुपये महाग, पेट्रोल निर्यातीवर टॅक्स 
13
अबुधाबीकडून भारतात ५ अब्ज डॉलर गुंतवणूक; एलपीजी पुरवठाही करणार
14
लेख: ‘द ग्लिनर्स’- इतक्या साध्या चित्रात खास असं नेमकं काय आहे?
15
विशेष लेख: ‘फॅशन’ उद्योजक खऱ्या कलाकारांची ‘किंमत’ करतात का?
16
मनोविकारांवरील उपचारांचे विद्यापीठ हरपले; डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन 
17
रुपया ९६ पार! भारतात महागाईचा उडणार डबलबार, अर्थव्यवस्थेवर दबाव; केंद्र सरकारची चिंता वाढली
18
Neet Exam Date: ‘नीट’ पुनर्परीक्षा २१ जूनला; पुढील वर्षीपासून ऑनलाइन
19
भगवान महावीरांची १०८ फूट उंच मूर्ती पाटण्यात उभारणार  
20
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
Daily Top 2Weekly Top 5

टायगरने घेतली ‘वाघिण’ दत्तक दत्तक योजना

By admin | Updated: May 18, 2014 00:56 IST

चित्रपट अभिनेता जॉकी श्रॉफचा मुलगा टायगर श्रॉफने महाराज बाग प्राणिसंग्रहालयातील एक वाघिण दत्तक घेतली आहे. त्यानुसार टायगरने शनिवारी दुपारी १२.१५ वाजता महाराज बाग

 महाराज बाग प्रशासनाला दिला एक लाखाचा धनादेश

नागपूर : चित्रपट अभिनेता जॉकी श्रॉफचा मुलगा टायगर श्रॉफने महाराज बाग प्राणिसंग्रहालयातील एक वाघिण दत्तक घेतली आहे. त्यानुसार टायगरने शनिवारी दुपारी १२.१५ वाजता महाराज बाग प्राणिसंग्रहालयाचे प्रभारी डॉ. सुनील बावस्कर यांना एक लाख रुपयांचा धनादेश प्रदान करून, दत्तक प्रक्रिया पूर्ण केली. यावेळी टायगरची पत्नी कृती त्याच्यासोबत होती. महाराज बाग प्रशासनाने मागील वर्षीपासून येथील वन्यप्राण्यांसाठी दत्तक योजना सुरू केली आहे. या योजनेतर्गंत कोणतीही व्यक्ती वा संस्था येथील प्राण्याला सहा महिने किंवा एक वर्षांसाठी दत्तक घेऊ शकतात. त्या मोबदल्यात संबंधित व्यक्ती किंवा संस्थेच्या नावाचा फलक त्या वन्यप्राण्याच्या पिंजर्‍यासमोर लावल्या जातो. विशेष म्हणजे, या योजनेत ‘लोकमत’ बाल विकास मंचाने सर्व प्रथम पुढाकार घेऊ न गतवर्षी येथील एका वाघिणीला दत्तक घेतले होते. त्यानंतर नुकत्याच काही महिन्यांपूर्वी केरळ येथील जीथून नायर या तरुणाने दुसरा वाघ दत्तक घेतला होता. शिवाय आता टायगर श्रॉफ याने सुद्धा एक वाघिण दत्तक घेतली आहे. महाराज बाग प्रशासनाच्या योजनेनुसार दत्तक घेणार्‍या व्यक्तीकडून एक लाख रुपयांचा निधी घेतल्या जातो. त्यातून वर्षभरातील त्या वाघाचे खाद्य व देखरेखीचा खर्च पूर्ण केल्या जातो. त्यानुसार टायगर श्रॉफने शनिवारी महाराज प्रशासनाला एक लाख रुपयांचा धनादेश देऊ न दत्तक प्रक्रिया पूर्ण केली. सोबतच यावेळी टायगरने वाघाचे छायाचित्र असलेले टी-शर्ट दाखवून ‘वाघाची सुरक्षा व संवर्धनाचा’ संदेश दिला. सध्या महाराज बाग प्राणिसंग्रहालयात एकूण चार वाघ आहेत. (प्रतिनिधी)