Rupee Historical Fall: भारतीय अर्थव्यवस्थेसाठी शुक्रवारचा दिवस अत्यंत चिंतेचा ठरला. परकीय चलन बाजारात भारतीय रुपयानं आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण नोंदवली आहे. इतिहासात पहिल्यांदाच रुपया प्रति डॉलर ९६ च्या पार गेला. बाजार उघडताच रुपयामध्ये सुरू झालेल्या या घसरणीमुळे गुंतवणूकदार आणि सर्वसामान्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. पश्चिम आशियातील तणावाची परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती यामुळे रुपयाचं मूल्य कमालीचं घटलं आहे. मात्र, सर्वसामान्यांसाठी हा केवळ एक आकडा नसून, त्यांच्या खिशावर होणारा हा थेट प्रहार आहे.
सर्वसामान्यांवर काय होऊ शकतो परिणाम?
किचनचं बजेट कोलमडणार : भारत आपल्या गरजेचा मोठा भाग, जसं की खाद्यतेल आणि डाळी, परदेशातून आयात करतो. रुपया कमकुवत झाल्यामुळे या वस्तू खरेदी करण्यासाठी आता अधिक डॉलर्स मोजावे लागतील. याचा थेट परिणाम म्हणून येत्या काही दिवसांत स्वयंपाकाचं तेल आणि डाळींचं भाव वाढू शकतात.
इंधन आणि वाहतूक महागणार : रुपयाच्या घसरणीचा सर्वात मोठा फटका इंधनाला बसतो. भारत आपल्या गरजेच्या ८०% तेल आयात करतो. रुपया ९६ च्या पार गेल्यानं कच्चं तेल आयात करणं अधिक महाग होईल. यामुळे केवळ पेट्रोल आणि डिझेलचे दरच वाढणार नाहीत, तर मालवाहू गाड्यांचं भाडं वाढल्यानं भाजीपाला आणि फळेही महाग होतील.
आरबीआयसमोर मोठं आव्हान
रुपयाची घसरण रोखण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेला आपल्या परकीय चलन साठ्यातून डॉलर्सची विक्री करावी लागू शकते. यासोबतच, महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी बँक व्याजदरात वाढ करण्याची शक्यता आहे. जर आरबीआयनं व्याजदर वाढवले, तर तुमच्या होम लोन आणि कार लोनचा हप्ता देखील वाढू शकतो.
Web Summary : The rupee plunged to a historic low of 96 against the dollar, impacting household budgets. Increased import costs for essentials like cooking oil and fuel will drive up prices, affecting consumers. RBI intervention is likely.
Web Summary : डॉलर के मुकाबले रुपया ऐतिहासिक रूप से 96 के निचले स्तर पर आ गया, जिससे घरेलू बजट प्रभावित हुआ है। खाना पकाने के तेल और ईंधन जैसी आवश्यक वस्तुओं की बढ़ी हुई आयात लागत से कीमतें बढ़ेंगी, जिससे उपभोक्ताओं पर असर पड़ेगा। आरबीआई का हस्तक्षेप संभावित है।