शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

वाघाचे रखवालदार उपाशी !

By admin | Updated: May 16, 2016 03:18 IST

पेंच व्याघ्र प्रकल्पातील विशेष व्याघ्र संरक्षण दलाचे (एसटीपीएफ) जवान रात्रंदिवस वाघाच्या संरक्षणात जंगलात पहारा देत आहेत्.

पेंच व्याघ्र प्रकल्प : ‘एसटीपीएफ’ चे पगार थांबलेनागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पातील विशेष व्याघ्र संरक्षण दलाचे (एसटीपीएफ) जवान रात्रंदिवस वाघाच्या संरक्षणात जंगलात पहारा देत आहेत्. मात्र या जवानांना मागील तीन महिन्यांपासून पगारच मिळाला नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे, या सर्व जवानांना जंगलात २४ तास तैनात करण्यात आले आहे. असे असताना वन विभागाने त्यांच्या भोजनाची कोणतीही व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे त्यांना स्वत:च्या भोजनाची स्वत:च व्यवस्था करावी लागते. मात्र तीन महिन्यांपासून पगार न झाल्याने पोट कसे भरावे,अशा चिंतेत सापडले आहे. शिवाय उपाशीपोटी ही फौज वाघाची सुरक्षा कशी करणार, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. शिकाऱ्यांपासून वाघांचे संरक्षण करण्यासाठी राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण (एनटीसीए) च्या पुढाकारातून वन विभागाने मागील चार वर्षांपूर्वी नागपूरसह संपूर्ण राज्यात या एनटीपीएफ जवानांची विशेष भरती केली आहे. त्यानुसार सध्या पेंच व्याघ्र प्रकल्पात एकूण ७६ एसटीपीएफ जवान तैनात आहेत. त्यामध्ये ५४ तरुण आणि २२ तरुणींचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या जवानांचे पगार वेळेवर न होणे, ही नेहमीच समस्या बनली आहे. मागील वर्षी सुद्धा या जवानांच्या पगाराची अशीच समस्या निर्माण झाली होती. वनविभाग वेळोवेळी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडे (एनटीसीए) बोट दाखवून आपली जबाबदारी झटकत आले आहे. या सर्व जवानांचे तीन महिन्यांपासून पगार थांबल्याने त्यांची फार मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. या एसटीपीएफ फौजेतील बहुतांश तरुण गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. त्यामुळे त्यांना अधिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यासोबतच वन विभागाने या सर्व जवानांच्या प्रवास भत्त्याचे बिले मागील चार वर्षांपासून रोखून ठेवले असल्याची माहिती पुढे आली आहे. शिवाय दुसरीकडे वन विभागातील इतर वनरक्षकांचे मात्र दोन महिन्यापूर्वीच प्रवासभत्ता बिले मिळाली आहे. तसेच ताडोबा येथील एसटीपीएफ जवानांना सुद्धा प्रवासभत्ता बिले देण्यात आली असल्याची माहिती आहे. असे असताना आमच्यावरच अन्याय का, असा पेंचमधील सर्व जवानांनी प्रश्न उपस्थित केला आहे. (प्रतिनिधी)