शहरं
Join us  
Trending Stories
1
बीजिंगमध्ये ट्रम्प-शी जिनपिंग यांची ऐतिहासिक भेट; द्विपक्षीय चर्चा सुरू, या मुद्द्यांवर होणार चर्चा
2
आता होर्मुझची गरज नाही! भारताने आखली ४००० कोटींची नवी योजना; गॅस पुरवठा होणार अधिक सुरक्षित
3
Petrol Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल महागणार? आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिले दरवाढीचे संकेत
4
Supreme Court: "हिंदू धर्म ही जीवनशैली, श्रद्धा सिद्ध करण्यासाठी मंदिरात जाणे अनिवार्य नाही, घरात दिवाही पुरेसा"
5
"लोकांना माझं बोलणं आवडत नाही, पण..." जिनपिंग यांची स्तुती करताना ट्रम्प यांनी विरोधकांना असं झापलं!
6
सामान्यांच्या खिशाला कात्री; सोने-चांदी ते दूध अन् पेट्रोलपर्यंत... गेल्या ४ दिवसांत देशात काय बदलले?
7
पेपरफुटीचे कनेक्शन केरळ व्हाया राजस्थान; ‘प्रायव्हेट माफिया’ ग्रुपवरून व्हायरल झालेली गेस पेपरची फाइल मूळ प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत मॅच
8
अपघात की कट? लग्नानंतर १४ व्या दिवशीच नववधूसोबत आक्रित घडलं; नवरा संशयाच्या भोवऱ्यात
9
Delhi Gangrape: दिल्ली हादरली! धावत्या बसमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, दोघांना अटक
10
Share Market: शेअर बाजाराचं जोरदार पुनरागमन! Sensex ४२६ अंकांनी वधारला; फार्मा आणि मेटल शेअर्समध्ये जबरदस्त तेजी
11
आजचे राशीभविष्य - १४ मे २०२६, अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, उत्पन्नात व व्यापार-व्यवसायात वाढ होईल
12
साखर निर्यातीला 'ब्रेक'! देशातील भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय; जागतिक बाजारपेठेत संकटाची भीती
13
नीट हिंदी येत नाही अन् सीतेची भूमिका करणार? साई पल्लवी ट्रोल, 'रामायण'च्या मेकर्सचा मोठा निर्णय
14
Prateek Yadav: प्रतीक यादव यांच्या मृत्यूच्या २४ तास आधी नेमकं काय घडलं? महत्त्वाची माहिती समोर!
15
CNG Price Hike: महागाईचा झटका! मुंबईत सीएनजीची दरवाढ, पाहा काय आहे नवी किंमत?
16
इमरान खान यांच्या पहिल्या पत्नी जेमिमा अब्जाधीश गुंतवणूकदारासोबत रिलेशनशिपमध्ये
17
मोठी बातमी! LPG आणणाऱ्या 'एमव्ही सनशाईन' जहाजाने पार केले होर्मुझ, नौदलाचे कडेकोट संरक्षण
18
भरघोस पगारासह देशसेवेची संधी! भारतीय वायुसेनेची भरती जाहीर; जाणून घ्या महत्वाच्या तारखा...
19
Gold Rate Prediction: सोने तब्बल २७ हजारांनी महाग होणार; डॉलर वाचविण्यासाठी केंद्र सरकारचा ‘सोन्या’वर घाव
20
अग्रलेख: सोने घ्यावे की न घ्यावे? निर्णय घेण्याची वेळ आली आहे
Daily Top 2Weekly Top 5

तिकिटांचा काळाबाजार

By admin | Updated: May 12, 2014 00:56 IST

उन्हाळ्याच्या सुट्यात रेल्वेगाड्यात प्रवाशांची गर्दी वाढली आहे. नागपुरातून चारही दिशांना जाणार्‍या रेल्वेगाड्यांमध्ये वेटींग आहे. यामुळे प्रवासी दलालांकडे जाऊन तिकिटाची खरेदी करीत आहेत.

नागपूर : उन्हाळ्याच्या सुट्यात रेल्वेगाड्यात प्रवाशांची गर्दी वाढली आहे. नागपुरातून चारही दिशांना जाणार्‍या रेल्वेगाड्यांमध्ये वेटींग आहे. यामुळे प्रवासी दलालांकडे जाऊन तिकिटाची खरेदी करीत आहेत. रविवारी सकाळी १०.३० वाजता रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करण्यासाठी रेल्वेस्थानकाच्या पूर्वेकडील भागातील आरक्षण कार्यालयात आलेल्या एका दलालाला रेल्वे सुरक्षा दलाने रंगेहाथ पकडून गजाआड केले. उन्हाळ्यात सर्वच रेल्वेगाड्यात वेटींगची स्थिती पाहावयास मिळत आहे. त्यामुळे ऐनवेळी प्रवासाचा बेत आखणारे प्रवासी आपला प्रवास सुखाचा व्हावा यासाठी दलालांकडे धाव घेत आहेत. रविवारी अमर अशोक गवळी (३०) रा. कुंभारपुरा संत्रा मार्केट हा रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणारा दलाल नागपूर रेल्वेस्थानकाच्या पूर्वेकडील संत्रा मार्केट भागात असलेल्या आरक्षण कार्यालयात आला. तेथे त्याने नागपूर -मुंबई दुरांतो एक्स्प्रेसच्या प्रवासाचे एसी ३ कोचचे ३ तात्काळ तिकीट खरेदी केले. त्यानंतर त्याने मुंबई-नागपूर प्रवासाचे स्लिपरक्लासचे आणि नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसचे स्लिपरक्लासचे तिकीट असे एकूण ८ हजार २८५ रुपये किमतीची रेल्वे प्रवासाची तिकिटे खरेदी केली. ड्युटीवर असलेले रेल्वे सुरक्षा दलाचे जवान विनोद राठोड, विकास शर्मा, सुशील मलिक, भगवान लेंडे यांनी या दलालावर पाळत ठेवली. तो तिकिटांचा काळाबाजार करण्यासाठी तिकीट खरेदी करीत असल्याची शंका बळावल्यानंतर त्यांनी या दलालास खरेदी केलेली रेल्वे प्रवासाची तिकिटे आणि आरक्षणाचे कोरे अर्ज यासह अटक केली. त्याच्याजवळून १ मोबाईल, १५० रुपये रोख जप्त करण्यात येऊन त्याचे विरुद्ध रेल्वे अ‍ॅक्ट १४३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. अटक केल्यानंतर या दलालास रेल्वे न्यायालयासमोर हजर करण्यात आले. (प्रतिनिधी)