शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:08 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क उमरेड : गिरड येथील दर्ग्यात दर्शन घेऊन नागपूरला परत येत असलेल्या भाविकांच्या ऑटाेला टिप्परने जाेरात धडक ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : गिरड येथील दर्ग्यात दर्शन घेऊन नागपूरला परत येत असलेल्या भाविकांच्या ऑटाेला टिप्परने जाेरात धडक दिली. त्यात तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये दाेनवर्षीय बालिकेचा समावेश आहे. ही घटना उमरेड पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील उमरेड-गिरड मार्गावरील धुरखेडा शिवारात रविवारीसायंकाळी ६.१५ च्या सुमारास घडली.

मृतांमध्ये ऑटाेचालक मोहम्मद शाकीर शेख अब्दुल कादीर (वय ४२), अब्दुल कादीर अब्दुल करीम (५५) आणि जुबिया अली इमरान अली (२५) या तिघांचा समावेश असून, यास्मीन शेख ताहीर शेख (३५), जोया शेख ताहीर शेख (१२) आणि जुनेरा अली इमरान अली (२) अशी जखमींची नावे आहेत. हे सर्वजण शांतीनगर, नागपूर येथील रहिवासी आहेत. मोहम्मद शाकीर शेख हे त्यांच्या कुटुंबीयांसह दाेन वेगवेगळ्या ऑटाेने गिरड येथील दर्ग्यात दर्शनासाठी गेले होते.

दर्शन आटाेपल्यानंतर ते ऑटाेनेच परत येत हाेते. दरम्यान, धुरखेडा शिवारात त्यांच्या ऑटाे (एमएच-४९/एआर-५०५२)ला विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या टिप्पर (एमएच-१५/जीव्ही-७४६७)ने जाेरात धडक दिली. धडक लागलाच ऑटाेचा चक्काचूर हाेऊन काही अंतरावर फेकली गेली. यात तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी झाले. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी तरुणांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी, तर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उमरेड येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. जखमींवर प्रथमाेचार करून नागपूर येथील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. उशिरापर्यंत गुन्हा नाेंदविण्याची प्रक्रिया सुरू हाेती.

...

मदत मिळण्यास विलंब

ताहीर अहमद शेख हाजी अब्दुल (३९), रज्जाक अली वाजिद अली (५०), नसरीन बानो रज्जाक अली (५०) व जिशान अली रज्जाक अली (२४) सर्व रा. शांतीनगर, नागपूर हे एमएच-४९/एआर-२५४१ क्रमांकाच्या ऑटाेमध्ये हाेते. ते पुढे आल्याने या अपघाताची माहिती त्यांना उमरेड शहरात पाेहाेचल्यानंतर काही वेळाने कळली. त्यामुळे सर्वजण अस्वस्थ झाले हाेते. शिवाय, जखमींना तातडीने मदत मिळाली नाही.