शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांच्या आंतरराज्यीय टोळीला अटक

By admin | Updated: August 2, 2015 03:00 IST

पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आंतरराज्यीय टोळीला खापरखेडा-पारशिवनी मार्गावर स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली.

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : आरोपींनी दिली ३८ गुन्ह्यांची कबुली नागपूर : पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आंतरराज्यीय टोळीला खापरखेडा-पारशिवनी मार्गावर स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्यांची चौकशी केली असता या टोळीने ठिकठिकाणी चोरी, दरोडा यासह इतर असे एकूण ३८ गुन्हे केल्याची कबुली दिली. या आरोपींकडून १० हजार रुपये रोख, टाटा सुमोसह तलवार, लोखंडी सब्बल, रबरी हॅन्ड ग्लोव्हज, कानस, चाव्यांचा गुच्छा, टॉर्च आदी असा एकूण एक लाख ६० हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.विक्की देवीदास चंद्रिकापुरे, भागवत बबन बेंडे, नीतेश रामाजी गजभिये, भीम्या ऊर्फ भीमराव फुले सर्व रा. पिपळा (डाकबंगला) व बाबूलाल संजय ठाकूर रा. यवतमाळ अशी आंतरराज्यीय टोळीतील आरोपींची नावे आहेत. शासकीय वाहनाची चोरी करून दरोडा करण्याच्या प्रयत्नात आरोपी असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश गोवेकर यांना २६ जुलै रोजी मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे रात्री स्थानिक गुन्हे शाखेचे तीन वेगवेगळे पथक तयार करून ते खापरखेडा-पारशिवनी मार्गावर पाठविले. दरम्यान भानेगाव (पारशिवनी फाटा) येथे मध्यरात्रीनंतर १ वाजताच्या सुमारास एमएच-३१/एसी-९८२४ क्रमांकाची टाटा सुमो रोडवर थांबली असल्याचे निदर्शनास आले. सुमोतील व्यक्तींची विचारपूस केली असता, सदर वाहन आंधळगाव येथील पाटबंधारे विभागाचे असून, वाहनातील चार जण याच विभागातील कर्मचारी असल्याचे चालकाने सांगितले. या सुमोतील एकास गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्याने ओळखले. तो पिपळा (डाकबंगला) येथील विक्की चंद्रिकापुरे असल्याचे पोलिसांच्या लक्षात येताच आरोपींनी तेथून वाहनासह पळ काढला. झडतीदरम्यान वाहनात कुकरी, चाकू, नटबोल्ट, रॉड, दोर, सब्बल, तलवार आदी साहित्य आढळले.