शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
3
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
4
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
5
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
6
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
7
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
8
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
9
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
10
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
11
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
12
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
13
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
14
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
15
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
16
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
17
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
18
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
19
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
20
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

३५ हजार जात वैधता प्रमाणपत्रांची होणार फेरतपासणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2019 02:44 IST

- गोपालकृष्ण मांडवकर  नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यात सहा ते सात वर्षापूर्वी झालेल्या ग्रापमंचायत निवडणुकीसाठीचे सुमारे ३५ हजार ...

- गोपालकृष्ण मांडवकर नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यात सहा ते सात वर्षापूर्वी झालेल्या ग्रापमंचायत निवडणुकीसाठीचे सुमारे ३५ हजार उमेदवार आणि अर्जदारांची जात वैधता प्रमाणपत्रे जप्त व रद्द करून त्यांची फेरतपासणी होणार आहे.३० जुलै २०११ ते ३१ आॅगस्ट २०१२ या काळात राज्यात ग्रामपंचायत निवडणुका झाल्या होत्या. त्यासाठी सुमारे ३५ हजार उमेदवारांनी जात वैधता पडताळणी समितीकडे अर्ज केले होते. त्यावर नवनिर्मित तत्कालिन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने उमेदवारांना प्रमाणपत्र दिले होते. मात्र ही प्रक्रिया नियमबाह्य झाल्याचा आक्षेप घेत सातारा येथील सामाजिक कार्यकर्ते मंगेश काशिद यांनी सर्वोच्च न्यायालयात २०१५ मध्ये याचिका दाखल केली होती. त्यावर १ आॅक्टोबरला न्यायालयाने निर्णय देऊन त्या काळातील सर्व जात वैधता प्रमाणपत्र रद्दबादल ठरविले. एवढेच नव्हे सर्व प्रमाणपत्र जप्त करून रद्द करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.पुण्याच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (बार्टी) महासंचालक कैलास कणसे यांनी जात वैधता प्रमाणपत्रांच्या फेरतपासणीची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सहा महिन्यांत या प्रमाणपत्रांची फेरतपासणी करून घ्यायची आहे.जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांचे सर्व उपायुक्त आणि सदस्यांची ४ नोव्हेंबरला पुण्यात बैठक झाली. २० नोव्हेंबर व ५ डिसेंबरला आढावा घेतला जाईल.अर्ज करण्याचे आवाहननागपूर जिल्ह्यात अशी २ हजार २० प्रकरणांची नोंद झाल्याची माहिती नागपूरचे जात पडताळणी समितीचे उपायुक्त तथा जिल्हा जात पडताळणी समितीचे सदस्य आर. डी. आत्राम यांनी दिली. संबंधितांना आवश्यक कागदपत्रांसह फेरतपासणीसाठी अर्ज करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

टॅग्स :Caste certificateजात प्रमाणपत्र