शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य सेवेत सेवाभावी संस्थांचे सहकार्य हवे

By admin | Updated: November 29, 2015 03:58 IST

आरोग्य सेवा क्षेत्रात सेवाभावी संस्था आणि व्यक्तींचे सहकार्य आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

खापरी येथे डायलिसिस सेंटरचे लोकार्पण : मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादननागपूर : आरोग्य सेवा क्षेत्रात सेवाभावी संस्था आणि व्यक्तींचे सहकार्य आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. खापरी येथील स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन व रोटरी क्लब आॅफ नागपूर ईशान्य यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू केलेल्या लद्धड डायलिसिस सेंटरचे लोकार्पण करतांना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मिशनचे अध्यक्ष डॉ. दिलीप गुप्ता होते. स्वामी विवेकानंद मेडिकल मिशनतर्फे सुरू करण्यात आलेले डायलिसिस सेंटर सर्वसामान्य रुग्णांना माफक दरात सेवा उपलब्ध करून देत आहे. या मिशनमध्ये रुग्णांवर विविध प्रकाराच्या शस्त्रक्रिया व उपचार केले जातात. हे सेवा कार्य आहे. या सेवा कार्यात संपन्न असलेल्या व्यक्तींनी सामाजिक भावनेने काहीतरी देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. रुग्णांवर उपचार होतांना परिवाराला मानसिक व आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत माफक दरात डायलिसिस सारखे उपचार मिळाले तर मोठा दिलासा रुग्णांच्या नातेवाईकांना मिळतो. समाजात माफक दरात डायलिसिस उपचार उपलब्ध करून देणारी केंद्रे मोठ्या प्रमाणात सुरू व्हावी, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. प्रास्ताविक भाषणात डॉ. दिलीप गुप्ता यांनी सांगितले, राजीव गांधी जीवनदायी योजना या मिशनतर्फे राबविण्यात येते. हे हॉस्पिटल समाज संस्था आणि सरकार या तिघांच्या सहकार्याने चालू असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी राहुल लद्धड यांनीही अपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी निमिष, सुनील, जीवनलाल, महेश, सतीश, हेमंत या लद्धड बंधूंचा तसेच रोटरी ईस्ट एलआयसी गोल्डन ज्युबिली फाऊंडेशन, प्रॉव्हिन्शियल आॅटोमोबाईल्स, अंकुर सीड्स, सत्यनारायण नुवाल, अमित पंचमतिया, ब्रह्मोस एरो स्पेस, स्टेट बँक आॅफ इंडिया, रोटरी ईशान्य या व्यक्ती व संस्थांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सुभाष लाघोटी, डॉ. प्रशांत ओंकार आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)